आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये अमली पदार्थ विरोधी दलाच्या महिला टीमने तब्बल 400 किलो प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला. तसेच त्या संपूर्ण मुद्देमालास आग लावून त्यासमोर हॉलिवूड स्टाइल फोटोसेशन केले. त्यांचे हेच फोटो आणि सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. अमली पदार्थ विरोधात महिलांनी छेडलेली ही एक नवीन मोहिम म्हणून आता लोक याकडे पाहत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये महिला हातात रायफल घेऊन पोझ देत आहेत. तर त्यांच्या बॅकग्राउंडला आगडोंब दिसून येतो. पाकिस्तानसारखा देशात जेथे महिलांना नेहमीच हीन वागणूक दिली जाते तेथील हे फोटो लोकांचा दृष्टीकोन बदलतील असे सांगितले जात आहे.
Is this a scene from a #Hollywood action movie? Female #Rambo in the making? Nah, it's Officer Rafia Baig & colleagues at #ANF celebrating @ a #drug burning ceremony in Peshawar 👊🏼#SayNoToDrugs #AntiNarcoticsForce #SDG5 #PakistanZindabad 🇵🇰 pic.twitter.com/AFxjo3DFEN
— Henriette Bjørge (@Henriettus) 24 October 2018
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.