आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : चार महिन्यांत ५० अल्पसंख्याक मुलींचे झाले आहे अपहरण, २०१८ मध्ये धर्मांतराची १००० प्रकरणे नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मांतर तेवढेच जुने आहे, जेवढी येथील मुस्लिम लोकसंख्या. ११-१५ वर्षीय हिंदू मुली त्याचे सर्वात जास्त लक्ष्य ठरत आहेत. गेल्या २० मार्चला सिंध प्रांताच्या धरकी भागात दोन हिंदू मुली अचानक बेपत्ता झाल्या. दोन दिवसांनी म्हणजे २२ मार्चला दोन्ही मुली समोर आल्या आणि म्हणाल्या की, आम्ही इस्लाम स्वीकारला आहे आणि मुस्लिम युवकांशी लग्न केले आहे. मुलींच्या वडिलांनी अपहरण आणि बळजबरीने धर्मांतराचा आरोप केला. पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी आणि तत्कालीन भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात यावरून वादही झाला होता. 


हे  एकमेव प्रकरण नाही. पाकच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू फक्त १.६♥% आहेत. २०१८ चे आकडे पाहिले तर त्यांची संख्या ३६ लाख होती. सिंध प्रांताच्या नबाव शहा येथील ४६ वर्षीय संवल मेघवार सांगतात,‘आम्ही खूप चिंतेत आहोत. आम्ही आमच्या तरुण मुलांना धर्मांतरापासून वाचवण्यासाठी भारत किंवा दुसऱ्या देशात पाठवण्यास असमर्थ आहोत.’ नवाब शहाच्या आसपासच्या भागांत धर्मांतराबाबतचा विरोधा आता रस्त्यांवरही दिसत आहे. या महिन्यात ५ जुलैला हजारो हिंदू, त्यात महिला-मुलेही होती, रस्त्यांवर उतरले. निदर्शक घोषणा देत होते,‘आमच्या मुलींचे अपहरण थांबवा, अल्पसंख्याक मुलींचे बळजबरीचे धर्मांतर रोखा.’ आंदोलकांचा दावा होता की, २०१९ मध्ये फक्त ४ महिन्यांत ५० पेक्षा जास्त अल्पसंख्याक मुलींचे अपहरण झाले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने ताज्या अहवालात मान्य केले आहे की, गेल्या वर्षी एकट्या सिंध प्रांतात अल्पसंख्यकांचे १००० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल झाली. हिंदू कार्यकर्ते भिको लाल म्हणाले,‘आम्हाला सुरक्षा हवी. सरकारने हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांच्या हक्कांचे संरक्षण करावे. उशीर होण्याआधीच पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ दबाव पाहून इम्रान खान यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


पाकिस्तानचा तिसरा मोठा पुरस्कार सितारा-ए-इम्तियाजने सन्मानित लेखिका किश्वर नशीद म्हणाल्या की,‘सरकार आणि कोट्यवधी पाकिस्तानी नागरिकांना या कृत्याचा विरोध करावा.’ सामाजिक कार्यकर्त्या ताहिरा गुल म्हणाल्या,‘आम्ही बळजबरीने धर्मांतर करण्याच्या अशा कृत्याला आमचा तीव्र विरोध आहे.’ प्रख्यात पाकिस्तानी वकील बाबर सत्तार म्हणाले,‘हे निंदनीय आहे.’ हिंदू कार्यकर्ते आणि घोटगी कोर्टात पीडित कुटुंबाचे वकील मुकेश मेघवार म्हणाले की, ‘जेव्हाही हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर करण्याचे प्रकरण समोर येते तेव्हा सरकार निवेदन जारी करून घटनेची निंदा करत असते.’

 

भरदिवसा मंदिरात येऊन डीएसपीच्या पत्नीचा गोंधळ; म्हणाली- पूजा बंद करा, मला झोप लागत नाही

पाकिस्तानमध्ये धर्मांतराव्यतिरिक्त इतर प्रकरणेही आहेत. अलीकडेच सिंधमधील हैदराबादमध्ये डीएसपीच्या पत्नीने मंदिरात गोंधळ घातला. ती बळजबरी घुसली आणि म्हणाली की, बंद करा ही पूजा. तुमच्यामुळे मी झोपूही शकत नाही. एका प्रत्यक्षदर्शीनुसार, तिने तिथे उपस्थित महिला आणि मुलांना खूप शिवीगाळ केली, अपमानित केले. हैदराबादच्या सिटीझन कॉलनीतील मंदिराच्या प्रशासकांपैकी एक रमेशकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की,‘जेव्हा ती महिला आत येऊन बोलायला लागली तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो. आम्हाला प्रार्थना करण्यापासून रोखले गेले. लोकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला मंदिर बंद करावे लागले.’ ही घटना ५ जुलैची आहे. दुसऱ्याच दिवशी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सिंधच्या पोलिस आयजींना घटनेची नोंद घ्यावी लागली. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की,‘आयजींनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा घटना पुन्हा होऊ देऊ नका, असे निर्देश दिले.’ मंदिर प्रशासनाने त्या महिलेला माफ केले, त्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.’