आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या रहिवासी भागात लष्करी विमान कोसळले, क्रूर मेंबर्स आणि स्थानिकांसह 19 जणांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील एका रहिवासी भागात मंगळवारी लष्करी विमान कोसळले. यात 5 क्रू मेंबर्ससह 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 14 सामान्य नागरिकांचा समावेश आहे. यासोबतच, इतर 12 जण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

 

पाकिस्तानी लष्कराने सांगितल्याप्रमाणे, प्लेन क्रॅशमध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे, रावळपिंडीच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराने हे विमान प्रशिक्षणासाठी निघाले होते. त्याच दरम्यान रावळपिंडी शहराजवळच्या एका गावात विमान कोसळले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी आंधार असल्याने बचावकार्याला विलंब लागला. या अपघातात गावातील अनेक घरांचे नुकसान झाले. अनेक घरांच्या छतांवर आणि अंगणात सुद्धा विमानाचे तुकडे सापडले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या लष्कराने परिसर सील केला असून कारणांचा सविस्तर तपास केला जात आहे.