आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लष्कर’चा पाकिस्तानी दहशतवादी नवीद जट याचा चकमकीत खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर -  लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वाँटेड पाकिस्तानी दहशतवादी नवीन जट बुधवारी चकमकीत ठार झाला. रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येसह अनेक हत्या प्रकरणांत सामील होता.  


पाकिस्तानच्या दहशतवादी शिबिरात त्याचे प्रशिक्षण २६/११ चा हल्लेखोर अजमल कसाब याच्यासोबत झाले होते. चार वर्षांपूर्वी सुुरक्षा दलांच्या हाती लागलेला नवीद गेल्या फेब्रुवारीत श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात उपचारादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून फरार झाला होता. चकमकीत ठार होण्याआधी तो सुमारे सहा वेळा वाचला होता. पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, चकमकीत नवीदचा एक सहकारीही ठार झाला. दहशतवादी दडून बसले असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर बडगामच्या कुठपोरा छत्तरगाममध्ये कारवाई सुरू करण्यात आली होती.

 

जवानांच्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यापैकी एक जण नवीद जट ऊर्फ हजल्लाह होता, असे समजले. सिंह म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या नागरिकाचा मृतदेह घेऊन जावा असे परराष्ट्र मंत्रालयामार्फत सांगण्यात आले आहे.  

 

दहशतवादी न झाल्यास युवकांचा गळा चिरत होता 
२२ वर्षीय नवीद जट पाकिस्तानच्या मुलतान येथील आहे. शालेय शिक्षण मध्येच सोडून तो २०१० मध्ये दहशतवादी झाला. मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये कुपवाडा मार्गे तो इतर सात दहशतवाद्यांसोबत काश्मीरमध्ये घुसला. तो कंपास, जीपीएस, वायरलेस सेट आणि स्काइप सॉफ्टवेअर यांचा वापर करण्यात तरबेज होता. फक्त पाच फूट उंची असलेल्या नवीदने अनेक दहशतवादी हल्ले केले. २०१४ मध्ये त्याला अटक करण्यात आली. पण या वर्षी फेब्रुवारीत उपचारासाठी श्रीनगरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून तो पळून गेला होता. तो खोऱ्यातील युवकांनी दहशतवादी बनवण्यासाठी पळवून नेत होता. त्यांनी नकार दिल्यास त्यांना गोळी मारत होता किंवा त्यांचा गळा चिरत होता.

 

काश्मीरमधील या दहशतवादी कारवायांत नवीदचा होता सहभाग  
हैदरपोरात लष्करावर हल्ला. हायवेजवळ सिल्व्हर स्टार हॉटेलवर हल्ला. दक्षिण काश्मीरमध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या छावण्यांवर तीन हल्ले. मे २०१३ मध्ये एका एएसआयची हत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये शोपियांत ग्रेनेड फेकून सीआरपीएफच्या जवानाची हत्या. बँकलुटीच्या अनेक घटनांतही त्याचा हात होता. 

बातम्या आणखी आहेत...