आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Azadi March Protest Leader Mualana Fazlur Rehman On PM Imran Khan's Resignation

'इम्रान खान यांनी 48 तासात राजीनामा द्यावा', आजादी मार्चमध्ये मौलाना फजलुर रहमानची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद(पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेले मौलाना फजलुर रहमानचा आजादी मार्च शुक्रवारी इस्लामाबादला पोहचला. मौलानाने अंदाजे दोन लाख आंदोलकांना संबोधित करताना सरकारला अल्टीमेटम दिला. ते म्हणाले की, "आम्ही इम्रान खान यांना दोन दिवसांचा वेळ देत आहोत. त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावं. पाकिस्तानने इम्रानपेक्षा जास्त निर्लज्ज पंतप्रधान अजून पाहीला नाहीये. त्यांनी देशाला विकले आहे." इस्लामाबादमध्ये पोहचलेल्या आजादी मार्चमध्ये नवाज शरीफ यांचे भाऊ शहबाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टोदेखील सामील होते.

"सिलेक्टेड पीएम मान्य नाही"
 
मौलाना यांच्या आधी बिलावल भुट्टोने भाषण दिले. म्हणाले, "आम्ही अशा पंतप्रधानाला इज्जत देऊ शकत नाहीत, जो इलेक्टेड नाही तर सलेक्टेड आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबून लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही सुरू आहे." मौलाना रहमाननेही भुट्टोला समर्थन दिले. म्हणाले, "इम्रानने सगळ्या गोष्टीत जनतेला धोका दिला आहे. ते फक्त काश्मीरबद्दलच बोलतात. भारताने काश्मीरमध्ये जे काही केले, त्याला ते थांबवूही शकले नाहीत. ते मुस्लिम वर्ल्डबद्दल बोलतात, पण यूएनमध्ये 5 देशांचे समर्थनदेखील मिळवू शकले नाही. 48 तासांचा वेळ त्यांना देत आहोत. त्यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर आम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील."

 

बातम्या आणखी आहेत...