Worldcup2019 / 316 धावांचे मोठे लक्ष देऊनही पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, अंतिम चार संघ झाले निश्चित

भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध होण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब

Jul 05,2019 08:32:00 PM IST

लंडन- क्रिकेट विश्वचषक 2019 मधील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर चौथा संघ ठरणार होता, पण यासाठी पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला मोठ्या अग्निपरीक्षेतून जावे लागणार होते. अखेर पाकिस्तानला चमत्कार घडवणारी खेळी करण्यात अपयश आल्याने न्यूझीलंड चौथा संघ म्हणून सेमीफायनलसाठी क्वालीफाय झाला आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध होण्याची शक्यता आहे.


पाकिस्तानने फलंदाजी करत बांगलादेशसमोर विजयासाठी 316 धावांचे तगडे आव्हान दिले खरे, पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये खेळायचे असेल तर एखाद्या अभूतपूर्व खेळीची आवश्यकता होती. पाकिस्तानने 316 धावांचे आव्हान दिल्यामुळे बांगलादेशला फक्त 6 धावात बाद करणे अनिवार्य बनले. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची आशा मावळली.

X
COMMENT