आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या सरफराजने मोडला धोनीचा विक्रम, एकाच कसोटी सामन्यात विकेटकीपर-कॅप्टन म्हणून सर्वीधिक झेल घेण्याचा गाजवला पराक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट डेस्क : पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला. जोहन्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकाविरूद्ध असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी त्याने हा पराक्रम गाजवला. सरफराजने या सामन्यात दोन्ही डावांत मिळून 10 झेल पकडले. यामुळे सरफराज एकाच कसोटी सामन्यात जास्त झेल घेणारा विकेटकीपर-कॅप्टन बनला आहे. याबाबतील सरफराजने ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्ट, भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि इंग्लंडचा अॅलेक स्टीवर्ट यांचा विक्रम मोडीत काढला आहे. 

 

 

एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे विकेटकीपर-कॅप्टन

 

कर्णधारझेलप्रतिस्पर्धी संघठिकाणवर्ष
सरफराज अहमद10दक्षिण अफ्रीकाजोहान्सबर्ग2019
महेंद्र सिंह धोनी8ऑस्ट्रेलियामेलबर्न2014
अॅडम गिलख्रिस्ट8श्रीलंकाडारविन2004
अॅलेक स्टीवर्ट8दक्षिण अफ्रीकानॉटिंघम1998

 

बातम्या आणखी आहेत...