Home | International | China | pakistan-china-relation

चीनचे पाकिस्तानला मैत्री टिकवण्याचे आश्वासन

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 11:28 AM IST

कुख्यात ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अडचणीत आलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी त्यांचा जुना मित्र देश चीन धावून आलाय.

  • pakistan-china-relation

    बीजिंग - कुख्यात ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अडचणीत आलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी त्यांचा जुना मित्र देश चीन धावून आलाय. चीनने पाकिस्तानला आपले समर्थन जाहीर केलंय. चीनचे राष्ट्रपती वेन जियाबाओ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी सांगितले आहे की त्यांच्यातील मैत्री पुढील काळातही कायम राहिल.    वेन यांनी बुधवारी येथील ग्रेट हॉल ऑफ द पिपलमध्ये गिलानी यांच्याबरोबर चर्चा केली. चीनची सरकारी वृत्तसंस्था झिन्हुआ यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी परस्परांसोबतची मैत्री पुढील काळात कायम ठेवण्याचे जाहीर केलंय. बंद खोलीत झालेल्या या चर्चेअगोदर वेन यांनी गिलानी यांच्या स्वागतार्थ कार्यक्रम आयोजित केला होता.    दोन्ही देश आर्थिक, तंत्रज्ञानविषयक आणि सुरक्षेच्या क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या करारांवर या भेटीच्यावेळी स्वाक्षऱया करणार असल्याचे पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मसूद खान यांनी सांगितले.    चीन आणि पाकिस्तानातील राजनैतिक संबंधांना ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही भेट आयोजित करण्यात आली होती. दहशतवाद्यांशी लढण्याच्या पाकिस्तान सरकारच्या प्रयत्नात आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करेल, असे चीनने गिलानी यांच्या भेटीपूर्वी म्हटले होते. पाकिस्तान हा वास्तवात दहशतवादाचा शिकार असल्याचे मतही चीनने व्यक्त केले आहे.Trending