International / पाकिस्तानचा तीळपापड! काश्मीरवर भारताच्या ऐतिहासिक निर्णयाचा पाककडून निषेध; आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्याची धमकी

पाक सरकारच नव्हे, तर भारतात काम करून पाकमध्ये गेलेल्या कलाकारांचाही विरोध

दिव्य मराठी

Aug 05,2019 03:34:35 PM IST

इस्लामाबाद - भारताने काश्मीरवर घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने पाकिस्तानातून जळफळाट व्यक्त केला जात आहे. काश्मीरातील कलम 370 हटवून भारताने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. भारताच्या या कथित बेकायदेशीर निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वच पर्यायांचा विचारप करून आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान देणार अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पाकिस्तानने काश्मीरला आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा म्हटले आहे.


भारताच्या निर्णयाने पाकिस्तानचा तीळ-पापड
भारताच्या निर्णयाला विरोध करताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, की "आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या अख्त्यारीतील काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. अशात भारताला एकट्याने त्यावर निर्णय घेऊन काहीही बदल करता येणार नाहीत. ही गोष्ट केवळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेलाच नव्हे, तर काश्मीरच्या सामान्य जनतेला सुद्धा मान्य असणार नाही." असा दावा पाकिस्तानने केला. केवळ पाकिस्तानी सरकारच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये काम करून स्वदेशात गेलेले पाकिस्तानी अभिनेते सुद्धा भारताच्या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यामध्ये मावरा होकेन आणि शाहरुख खानसोबत काम केलेल्या माहिरा खान हिचा देखील समावेश आहे.

X