Home | Sports | From The Field | pakistan cricket boards change pakistan cricket team captain

पाकिस्तान क्रिकेट संघाचे दोन वर्षात बदलले 11 वेळा कर्णधार

Agency | Update - May 21, 2011, 01:06 PM IST

पाकिस्तान क्रिकेट संघाचे गेल्या दोन वर्षात 11 वेळा कर्णधार बदलण्यात आले आहेत.

  • pakistan cricket boards change pakistan cricket team captain

    afir_256कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) माजी खेळाडूंनी टीका केली आहे. पाकिस्तामध्ये सामने होत नसल्याने अडचणीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे गेल्या दोन वर्षात पीसीबीकडून 11 वेळा कर्णधार बदलण्यात आले आहेत.

    पीसीबीचे माजी अध्यक्ष लेफ्टनंट जनरल तौकिर झिया यांनी संघाचा कर्णधार सतत बदलत असल्याने संघात फूट पडत असल्याचे म्हटले आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिस्बाह उल हककडे देण्यात आले आहे. पीसीबीने आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याचे कारणही दिलेले नाही.

    पीसीबीच्या अध्यक्षपदी एजाज बट्ट यांची नियुक्ती झाल्यापासून पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी शोएब मलिक, युनूस खान, मोहम्मद युसूफ, शाहिद आफ्रिदी, सलमान बट्ट आणि मिस्बाह उल हक यांची वर्णी लागलेली आहे. बट्ट् यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या कामकाजावर अनेक माजी खेळाडूंकडून टीका होत आहे.



Trending