Home | Sports | From The Field | pakistan cricket in trouble

पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने धोक्यात

Agency | Update - May 28, 2011, 07:17 PM IST

पाकमधील विविध क्षेत्रावर लादेनला ठार मारल्याच्या घटनेचा विपरीत परीणाम पडला आहे.याच वाढत्या दहशतवादी कारवायामुळेच पाकिस्तानातील क्रिकेटही धोक्यात आले आहे.

  • pakistan cricket in trouble

    कराची - गत महिन्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारल्याच्या घटनेमुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकमधील विविध क्षेत्रावर लादेनला ठार मारल्याच्या घटनेचा विपरीत परीणाम पडला आहे.याच वाढत्या दहशतवादी कारवायामुळेच पाकिस्तानातील क्रिकेटही धोक्यात आले आहे.

    स्थानिक परिसरात वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळेच एकदिवसीय सामन्यांसाठी पाक दौऱ्यावर येत असलेल्या श्रीलंका संघाने नकार दिला आहे.त्यापाठोपाठच आयर्लंड संघाचा दौराही अद्याप स्पष्ट झालेला नाही.त्याआधीच इंग्लंड संघाने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलेच अडचणीत सापडले आहे.

Trending