WC2019 / 'आम्ही पाकिस्तानी सुद्धा तुमच्या विजयाची दुआ करत होतो!' भारताच्या पराभवानंतर शोएबचा इमोशनल अत्याचार

इंग्लंडच्या विजयानंतर शोएबने एक भावनिक व्हिडिओ केला शेअर

दिव्य मराठी वेब

Jul 01,2019 04:45:30 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड कपमध्ये रविवारच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 31 धावांनी पराभूत केले. या पराभवाचे दुख जितके भारत आणि भारतीय प्रेक्षकांना आहे, त्याहून कितीतरी पटीने अधिक शोक पाकिस्तानी व्यक्त करत आहेत. भारताच्या पराभवावर नाराज झालेल्या पाकिस्तानी फॅन्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तरची देखील भर पडली. विशेष म्हणजे, या पाकिस्तानी क्रिकेटरने सामन्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करून भारताची मदत मागितली होती. मात्र, इंग्लंडचा विजय झाल्यानंतर आता तो तीव्र नाराज आहे. ही नाराजी त्याने अतिशय भावनिक शब्दांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली.


आम्ही पाकिस्तानी भारताच्या विजयाची दुआ करत होतो...
भारताच्या पराभवाने रावळपिंडी एक्सप्रेसला मोठा झटका बसला आहे. त्याने आपल्या भावना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. शोएब म्हणाला, "भारताच्या फाळणीनंतर ही पहिलीच वेळ होती की आम्ही भारताचे समर्थन करत होतो. मला पूर्ण विश्वास होता की भारत आपले शंभर टक्के देऊन चांगलेच प्रदर्शन करणार आणि पाकिस्तानलाही मदत करेल. आम्ही हीच अपेक्षा करत होतो. ही पहिलीच वेळ होती, भारतीय उपखंड पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि श्रीलंकन चाहते भारताच्या इंग्लंडवर विजयाची दुआ करत होतो. परंतु, आमच्या दुआ भारतापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत आणि त्यांचा पराभव झाला."


प्रत्यक्षात हे आहे शोएबच्या नाराजीचे कारण
भारताने या सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यास पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये जागा मिळाली असती. परंतु, भारताच्या पराभवानंतर इंग्लंडचे गुण 10 झाले आहेत आणि पाकिस्तान पिछाडीवर गेला आहे. भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंग झाल्याचे दिसून येत आहे.

X
COMMENT