आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan : Ex President General Musharraf's Death Sentence Waived, The High Court Said Special Court Verdict Unconstitutional

माजी राष्ट्रपती जनरल मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा माफ, हायकोर्ट म्हणाले- विशेष कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर 2007 मध्ये संविधान स्थगित केल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप केला
  • मुशर्रफ यांना बेनजीर भुट्टो आणि धार्मिक गुरूंच्या हत्येप्रकरणी फरार घोषित करण्यात आले होते

इस्लामाबाद - लाहोर उच्च न्यायालयाने सोमवारी माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांच्या फाशीची शिक्षा माफ केली आहे. न्यायालयाने त्यांची शिक्षा माफ करत सांगतिले की, या प्रकरणातील विशेष कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य आहे. विशेष न्यायालयाने घटना स्थगित करून आणीबाणी लागू केल्याप्रकरणी मुशर्रफ यांना 17 डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. 
 
लाहोर उच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपतींची फाशीची शिक्षा माफ करत म्हटले की, मुशर्रफ यांच्याविरूद्ध विशेष न्यायाधिकरणाचा निर्णय घटनाबाह्य आहे. त्याच्याविरूद्ध दाखल केलेला खटला केलेले युक्तीवाद हे बेकायदेशीर आहेत. यानंतर हायकोर्टाने विशेष कोर्टाचा निर्णय पलटविला. मुशर्रफ यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात अपील केले होते. संविधान स्थगित करून आणीबाणी लागू केली होती


मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत शासन केले. या दरम्यान 3 नोव्हेंबर 2007 रोजी संविधान स्थगित करून आणीबाणी लागू केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात डिसेंबर 2013 मध्ये सुनावणी सुरू झाली होती. मार्च 2014 मध्ये त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. मात्र वेगवेगळ्या अपील मंचांवर हे प्रकरण सुरू असल्यामुळे हा खटला टाळला जात होता. मुशर्रफ यांनी मंद न्याय प्रक्रियेचा फायदा घेत 2016 मध्ये पाकिस्तान सोडले आणि दुबईला गेले. तेव्हापासून मुशर्रफ दुबईमध्ये असून गंभीर आजाराने उपचार घेत होते.मुशर्रफ यांनी शिक्षा चुकीची असल्याचे सांगितले होते


माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे पहिले लष्करी शासक आहेत, ज्यांच्याविरूद्ध कोर्टात खटला चालविला गेला. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर 18 डिसेंबर रोजी त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत मुशर्रफ यांनी सांगितले की, "देशद्रोहाचे प्रकरणी निराधार आहे. विश्वासघात सोडा मी तर अनेकवेळा या देशाची सेवा केली आहे. अनेकवेळा लढा दिला. 10 वर्षांपर्यंत सेवा केली. माझ्या विरोधात चौकशी करण्यासाठी कमीशन स्थापन करण्यात आले आहे. नक्कीच स्थापन करा. परंतु हे कमीशन येथे येऊन माझी प्रकृती पाहा आणि विधान नोंदवा. यानंतरच कोणती कारवाई करण्यात यावी. या कमीशनचे कोर्टानेही ऐकावे. मला न्याय मिळले अशी मला आशा आहे."भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी फरार घोषित करण्यात आले होते


मुशर्रफ यांना माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो आणि लाल मशिदीचे धार्मिक गुरूंच्या हत्येप्रकरणी फरार घोषित करण्यात आले होते. दरम्यान परवेझ मुशर्रफ देशद्रोही होऊ शकत नाहीत असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले होते.
 

बातम्या आणखी आहेत...