Home | International | Pakistan | pakistan ex president pervez musharraf proclaimed offende

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरारी घोषीत

Agency | Update - May 30, 2011, 08:18 PM IST

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना रावळपिंडी न्यायालयाने आरोपी बनवीत फरारी घोषीत केले आहे.

  • pakistan ex president pervez musharraf proclaimed offende

    mushraf_258इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना रावळपिंडी न्यायालयाने आरोपी बनवीत फरारी घोषीत केले आहे. बेनझीर भुट्टो हत्याकांडप्रकरणी तपास पथकाला सहकार्य न केल्याने न्यायालयाकडून हा निर्णय सुनाविण्यात आला आहे.

    बेनझीर भुट्टो यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. रावळपिंडी येथील दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश राणा निसार अहमद यांनी तपास पथकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला. मुशर्रफ यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल, मात्र त्यांना अटक करणे शक्य नाही. मुशर्रफ सध्या ब्रिटनमध्ये असून, पाकिस्तान ब्रिटनमधून कोणाचे प्रत्यर्पण करू शकत नाही.Trending