Home | Maharashtra | Mumbai | Pakistan FM During Mumbai Terror Attack Gets The Same Portfolio In Imran New Cabinet

ज्याच्या कार्यकाळात Mumbai वर झाला होता सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, तोच बनला Pak चा नवा परराष्ट्रमंत्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 20, 2018, 03:59 PM IST

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन मंत्री कुरेशी भारतातच होते.

 • Pakistan FM During Mumbai Terror Attack Gets The Same Portfolio In Imran New Cabinet

  मुंबई / इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुरळीत करण्यासह 'नया पाकिस्तान'चे स्वप्न दाखवणारे माजी क्रिकेटर इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी आपल्या 20 मंत्र्यांच्या नव्या कॅबिनेटची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या कॅबिनेटमध्ये शाह महमूद कुरेशी यांना सर्वात महत्वाचे असे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आले आहे. सत्ताधारी पीटीआय पक्षाचे उपाध्यक्ष असलेले कुरेशी इम्रान यांचे खास नेते आहेत. त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे, मुंबईवर 26 सप्टेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हेच पाकिस्तानचे परराष्ट मंत्री होते. इम्रान यांचा खास असलेल्या या नेत्याची कारकीर्दच वादग्रस्त राहिली आहे.


  पीपीपी, पीएमएल-एनचेही होते सदस्य
  1985 मध्ये शाह महमूद कुरेशी पहिल्यांदा पंजाब प्रांतातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (PML-N) चे नेते होते. सोबतच एकेकाळी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे देखील सदस्य राहिले आहेत. 2008 मध्ये त्यांना तत्कालीन पीपीपी सरकारने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री केले होते. त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार देखील म्हटले जात होते.


  हल्ला झाला त्यावेळी भारतात होते...
  शाह महमूद पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते, त्याचवेळी मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला होता. एवढेच नव्हे, तर ज्यावेळी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी ते भारतातच होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या बायोग्राफीत त्या घटनेचा उल्लेख केला आहे. महमूद कुरेशी दिल्लीतच होते आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्यांना वेळीच भारतातून निघून जाण्यास सांगितले होते. 2010 मध्ये त्यांनी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांचा अपमान केला होता. कृष्णा त्यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर होते. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावर आवाज उठवला तेव्हा शाह यांनी त्यांच्याच अधिकारांवर सवाल उपस्थित केले होते.

Trending