International Special / पाकिस्तान काश्मीर प्रकरण संयुक्त राष्ट्रानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार, पाकला फक्त चीनचा पाठिंबा


केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा परत घेतला

दिव्य मराठी

Aug 20,2019 09:17:00 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज(मंगळवार) सांगण्यात आले आहे की, इम्रान खान सरकार काश्मीर प्रकरणाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. याआधी पाकिस्तानने हे प्रकरण यूएनएससीमध्ये नेले होते, तिथे पाकच्या पदरी निराश आली होती.


केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागून करुन विशेष राज्याचा दर्जा परत घेतला होता. तेव्हापासून राज्यात तनावपूर्ण वातावरण आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रकरण यूएनएससीमध्ये नेले होते, पण चीनसोडून इतर कोणत्याच देशाने पाकचे समर्थन केले नाही.


गुप्त बैठकीत पाकला कोणीच समर्थन दिले नाही
काही दिवसांपूर्वीच काश्मीर प्रकरणी सुरक्षा परिषदेत गुप्त बैठक झाली होती, पण तिथे काहीच निर्णय झाला नाही. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान आणि सहयोगी चीनद्वारे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

X