आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान सरकारचा अजब प्रकार; मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टॉयलेटमध्ये कर्मचाऱ्यांना जाता येऊ नये म्हणून लावले 'बायोमॅट्रिक मशीन्स'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आपला बंगला सोडून एका साध्या फ्लॅटमध्ये राहत आहेत तर दूसरीकडे सरकारमधील मंत्री आपला राजेशाही थाट कमी करण्याचे नाव घेत नाहीयेत. पाकच्या उद्योग मंत्रालयातून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मंत्रयातील टॉयलेटमध्ये ऑफिसर आणि व्हीआयपी लोकांव्यतिरिक्त कोणालाही जाता येऊ नये यासाठी टॉयलेटच्या बाहेर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आल्या आहेत. यामुळे आता कर्मचाऱ्यांना सार्वजनिक टॉयलेटचा वापर करावा लागणार आहे. 


सामान्य कर्मचाऱ्यांसाठी आधारभूत सुविधा नाहीत

रिपोर्ट्सनुसार या व्हीआयपी बाथरूममध्ये फक्त अतिरिक्त सचिव आणि त्यावरी अधिकाऱ्यांना प्रवेश करता येणार आहे. एखाद्या मीटिंग दरम्यान अधिकाऱ्यांना टॉयलेटच्या रांगेत जास्त वेळ उभे रहावे लागू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान साधारण कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात हँडवॉश आणि टॉयलेट पेपरची सुविधा नसल्याचा मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे.