Home | International | Pakistan | pakistan government protect underworld don dawood ibrahim

दाऊदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरकार सरसावले

Agency | Update - May 23, 2011, 10:40 AM IST

पाकिस्तानमध्ये आश्रयास असलेल्या दाऊदने आपल्या मुलाचा लग्नाचा समारंभ रद्द केला असून, पाकिस्तानी सरकारकडून सैनिकांना त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

  • pakistan government protect underworld don dawood ibrahim

    कराची - पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आल्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदही भयभीत झाला आहे. पाकिस्तानमध्ये आश्रयास असलेल्या दाऊदने आपल्या मुलाचा लग्नाचा समारंभ रद्द केला असून, पाकिस्तानी सरकारकडून सैनिकांना त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

    दाऊद हा भारतातील मोस्ट वॉन्टेड यादीत पहिल्या स्थानावर असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. दाऊद इब्राहिमने आपला मुलगा मोईन याच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी रद्द केली. दाऊद स्वतःच्या बचावासाठी प्रय़त्न करीत असून, पाकिस्तान सरकारही त्याला मदत करीत आहे. दाऊदच्या सहकाऱ्यांवर मुंबईत हल्ला झाल्याची घटना ताजी असून, त्याच्या भाऊ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. लादेनच्या मृत्यूनंतर दाऊदवरील दबाव वाढला असून, भारताकडूनही त्याला परत देण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात येत आहे. दाऊद हा भारतातून 1984 साली पळून गेला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या शोधात आहे. दाऊद हा कराचीतील क्ल्फिंटन रोड परिसरातील 20 हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Trending