International Special / काश्मीरमध्ये नरसंहार झाल्याचे आपल्याकडे कोणतेच पुरावे नाहीत, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याबाबत पाकिस्तानच्या वकीलाची भूमिका


कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानची बाजू मांडतात वकील खवर कुरैशी
 

दिव्य मराठी वेब

Sep 03,2019 05:25:00 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानने दोन आठवड्यांपूर्वी काश्मीर प्रकरणाला आंतरराष्ट्रीय न्यायालयान नेण्याबद्दल वक्तव्य केले होते. पण, इम्रान सरकारच्या या प्रयत्नांना अपयश आले आहे. आयसीजेमध्ये पाकिस्तानचे वकील खवर कुरैशी म्हणाले की, संपूर्ण जग काश्मीरला भारताचा भाग मानते. तसेच पाकिस्तानकडेही काश्मीरमध्ये नरसंहार झाल्याचे कोणतेच पुरावे नाहीयेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात काश्मीरला मुद्दा बनवणे पाकिस्तानसाटी अवघड आहे.


खवर कुरैशी तेच वकील आहेत ज्यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतराष्ट्रीयात पाकिस्तानची बाजू मांडली होती. लाहौरमधील एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले की, काश्मीरचा मुद्दा एकदम स्पष्ट आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दा येताच काश्मीरला भारताचा भाग असल्याचे सर्व मानतात.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकच्या पदरी पडले अपयश
पाकने दोन आठवड्यांपूर्वी म्हटले होते की, काश्मीर प्रकरणाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये घेऊन जाणार आहोत. त्या आधी पाकने हे प्रकरण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही उचलले होते, पण तिथे त्यांच्या पदरी निराश आली.

X
COMMENT