आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Imran Khan Government Resolution For Public Hanging Of Child Rapists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांव लैंगिक आत्याचार करणाऱ्यास सर्वांसमोर फासावर लटकवले जाईल, पाकिस्तानी संसदेत प्रस्ताव मंजुर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानात जानेवारी त जूनदरम्यान लैंगिक शोषणाचे 1304 प्रकरण समोर आली आहेत

इस्लामाबाद- पाकिस्तानी संसेत आज(शुक्रवार) लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सार्वजनिकरित्या फाशी देण्याच्या प्रस्तास मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव संसदीय राज्य कार्यमंत्री अली मोहम्मद खान सादर केला. पंरतू, पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) चे नेते आणि माजी पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांनी या कायद्याचा विरोध केला. ते म्हणाले की, शिक्षा वाढवल्यामुळे गुन्ह्यात कमी येणार नाही. सार्वजनिकरित्या फाशी देण्याचा कायदा आमलात आणू नये, हा संयुक्त राष्ट्राच्या कायद्याचे उल्लंघन असेल. 


संसदेत या प्रस्तावास खूप समर्थन मिळाले आहे. पण, याच्या विरोधात बोलणारे फक्त परवेज अशरफ एकटेच नव्हते. त्यांच्याशिवाय इम्रान सरकारमध्ये विज्ञान आणि औद्योगीक मंत्री फवाद चौधरी यांनीदेखील या कायद्याचा विरोध केला आहे. त्यांनी एक ट्वीट करुन म्हणाले की, "हा कायदा एका क्रुर प्रथेच्या दिशेने नेणारा आहे. समाज नेहमी संतुलीतरित्या चालतो. मारणे हे गुन्ह्याचे उत्तर नाही."  

मानवाधिकार मंत्र्यांने क्रूर निर्णयाला बरोबर म्हटले

दुसरीककडे सरकारमधील मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी स्पष्ट केले की हा प्रस्ताव सरकारडे मांडला नव्हता. तो एका व्यक्तीने मांडला होता. पाकिस्तानमध्ये लहान मुलांसोबत लैंगिक आत्याचार होण्याच्या घटना सामान्य आहेत. लहान मुलांच्या अधिकाराची संघटना ‘साहिल’च्या एक रिपोर्टनुसार, मागच्या वर्षीय जानेवारी ते जूनदरम्यान 1304 प्रकरणे समोर आले आहेत.