International Special / पाकिस्तानची आणखी एक कुरापत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला जाण्यासाठी एअरस्पेस नाकारला

राष्ट्रपती कोविंद सोमवारी आइसलंड, स्विट्जरलंड आणि स्लोवानियाच्या 8 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत

दिव्य मराठी वेब

Sep 07,2019 05:45:40 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला जाण्यासाठी आपले हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशीने शनिवारी पत्रकारांना याची माहिती दिली. कुरैशी यांनी सांगितले की, काश्मीरची सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतिी कोविंद सोमवारी आइसलंड, स्विट्जरलंड आणि स्लोवेनियाच्या 8 दिवसीय दौऱ्यावर जात आहे.

काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने 8 ऑगस्टला भारतासाठी आपला हवाई मार्ग बंद केल्याची घोषणा केली होती. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानमधून जाणाऱ्या 9 मार्गांपैकी 3 मार्ग पाकिस्तानने सध्या बंद केले आहेत. पाकिस्तानचा हवाई मार्ग बंद झाल्याने सध्या भारतीय विमानांना यूरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व देशांकडे जाण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे.

X
COMMENT