आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan International Airlines Directed To Cabin Crew Members For Lose Weight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानच्या हवाई कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्याचे आदेश; वाढल्यास पगार कापणार, नोकरीही जाण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - आठवी नापास वैमानिकांसाठी सध्या ट्रोल होत असलेला पाकिस्तान विमान सेवेमुळेच पुन्हा चर्चेत आला आहे. नवीन वर्षात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइंसने (PIA) पायलट आणि क्रू मेंबर्सना वजन कमी करण्याचे टार्गेट दिले आहेत. निश्चित स्वरुपात या कर्मचाऱ्यांनी वजन घटवले नाही तर त्यांना नोकरीवरून कमी केले जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तानी एअरलाइन्सने 2016 मध्ये वैमानिकांना अशाच प्रकारचे आदेश दिले होते.


वजन वाढल्यास पगार कापणार...
पीआयएने आपल्या सर्कुलरमध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार, पायलट आणि कर्मचाऱ्यांना निश्चित वेळेच्या आत 13.6 किलो पर्यंत वजन कमी करावे लागेल. यात वजन वाढत असेल तर वाढत्या वजनाप्रमाणे मासिक वेतनात किती कपात करण्यात आली याची माहिती दिली जाणार आहे. जास्त वजन असलेल्या क्रू मेंबर्रला दरमहा 2.3 किलो कमी करावेच लागेल. यासंदर्भातील पहिली चाचणी 31 जानेवारी 2019 रोजी घेतली जाणार आहे. त्यामध्ये वजन जास्त असल्याचे आढळल्यास एअरलाइन्सच्या मेडिकल सेंटरमध्ये पाठवले जाईल आणि वजन कसे कमी करावे यावर मार्गदर्शन केले जाईल.


यासोबतच ठराविक वजनानंतरच्या लगेजवर मिळणारी सूट सुद्धा रद्द केली जाणार आहे. सद्यस्थितीला 13.6 किलो अतिरिक्त वजन असलेल्यांना सूट दिली जात आहे. परंतु, दरमहा ही सूट कमी-कमी होत जाणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यासाठी ही सूट 11.33 किलोवर येणार आहे. शेवटची तारीख 1 जुलै 2019 राहील. या दरम्यान दरमहा वजन वाढवणाऱ्यांचे वेतन कापले जाईल. मुदत संपल्यानंतर जो टार्गेट पूर्ण करणार नाही त्याला नोकरीवरून काढले जाणार आहे.