आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया पेक्षाही धोकादायक आहे पाकिस्तान, इथेच मिळतो दहशतवाद्यांना सर्वाधिक आश्रय, या अहवालाने केला दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क/लंडन - पाकिस्तान सध्याच्या काळात सीरियापेक्षाही जास्त धोकादायक आहे. जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तान सिरियापेक्षा तीन पट अधिक जबाबदार आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि स्ट्रॅटेजिक फोर्स ग्रुप (एसएफजी) यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. 'ह्युमिनिटी अॅट रिस्क - ग्लोबल टेरर थ्रेट इन्टिकेट' शिर्षकाने  हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

 

दहशतवाद्यांचे आश्रयस्थान पाकिस्तानमध्येच 
लष्कर-ए-तोयबा'ने आंतरराष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक धोका निर्माण केल्याचे अहवालात म्हटले आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानला समाविष्ट केले गेले आहे. अहवालातील तथ्य आणि आकड्यांच्या आधारे सर्वात धोकादायक दहशतवादी संघटनांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान अग्रेसर आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेले दहशतवादी गटांना पाकिस्तानचे समर्थन आहे.

 

>> अहवालात म्हटले आहे की, सर्व प्रकारचे प्रतिस्पर्धी बंड, विनाशकारी शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर होणारा दुरुपयोग आणि आर्थिक समस्या यामुळे मानवी प्रगती कमी होते. यामध्ये दहशतवाद आणि त्या संबंधित असलेल्या गोष्टी मानवजातीसाठी धोकादायक आहे.' ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि स्ट्रॅटेजिक फोर्स ग्रुपने सादर केलेल्या 80 पानांच्या अहवालात 20 व्या शतकाच्या पहिल्या सहा दशकात, जगातील 200 अतिरेकी गटांचे विश्लेषण केले आहे.

 

>> या अभ्यासात म्हटले आहे की, इसिस आणि अल-कायदा दहशतवादाच्या सर्वात मोठ्या संघटना म्हणून उदयास आल्या आहेत. अल-कायदाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, पण त्याचा सर्वात जास्त त्रास अफगाणिस्तानला झाला.

 

'लादेन' पाकविरूद्धचा सर्वात मोठा पुरावा
अहवालात म्हटले आहे की, ओसामा-बिन-लादेन अबोटाबाद येथील एका पाकिस्तानी लष्करी भागात सुरक्षित ठिकाणी आश्रयास होता. अहवालानुसर लष्करी परिसरातील असलेली दहशतवाद्यांची उपस्थिती पाकिस्तान दहशतवादाचा सर्वात मोठा पोषक असल्याचे दर्शवते. 

 

बातम्या आणखी आहेत...