आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेतन भगत पाकिस्तानला कमी लेखणे आम्हा भारतीयांना आवडते, जणू हे वैशिष्ट्य बनले आहे. आमच्या वृत्तवाहिन्या तेच दाखवत असतात, जे प्रेक्षकांना पाहायला आवडते. पाकिस्तान किंवा इम्रान खानला कसे अंडर एस्टिमेट किंवा एक्स्पाेज केले या धाटणीचे कार्यक्रम चालवले जात असतात. यासंदर्भात हिंदी भाषिक वाहिन्या तर अधिक रचनात्मक आणि उत्साही आहेत. ते इम्रान खानचा व्यथित फाेटाे दाखवतात आणि हिंदी वाक्प्रचारासह हेडलाइन दाखवत राहतात- पाकिस्तान की नाक कट गई / पाकिस्तान कहीं का नहीं रहा / पाकिस्तान ने घुटने टेके…. मग भलेही संयुक्त राष्ट्र संघाची बैठक असाे, पंतप्रधानांचा अमेरिका दाैरा असाे, दहशतवादी कारवाईचा पुरावा किंवा पाकिस्तानचे गैरव्यवस्थापन, म्हणजे शेजारी राष्ट्रावर ताेंडसुख घेण्याची संधी आम्ही साेडत नाही. जर हा विनाेदाचा विषय असता तर काेणतीही हानी न पाेहाेचवणारे हास्य ठरले असते. परंतु समस्या तर अधिक गंभीर आणि जुनी आहे. जसजसे भारतात राष्ट्रवाद बळावताे, तेव्हा पाकिस्तानला कमी लेखण्याची बाब ही अनिवार्य हाेऊन बसते. ‘आम्ही पाकिस्तानपेक्षा बेहतर आहाेत’ची मनाेवृत्ती आणि सातत्याने त्यास प्रमाणित करण्याच्या प्रयत्नांना आवर घालण्याची गरज निर्माण हाेत आहे. कारण, यामुळे भारताचेच नुकसान हाेत आहे. मला पाकिस्तानविषयी काही कळवळा नाही. पाकसमर्थित दहशतवादामुळे भारताचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याच्या चुकीच्या गाेष्टी जगाच्या चव्हाट्यावर मांडल्या पाहिजेत. याशिवाय आपल्या हितासाठी स्वत:ची पाकिस्तानशी तुलना करणे आणि स्वत:ची पाठ थाेपटून घेणे थांबवले पाहिजे. कधी आपण बांगलादेश, श्रीलंकेशी तुलना करताे? भारतीय राजदूताने संयुक्त राष्ट्र संघात लंकेची बाेलती बंद केली, असे आम्ही कधी म्हटले? की बांगलादेशच्या नेत्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला? आम्ही असे करीत नाही कारण आम्हाला कल्पना आहे की, आम्हीच सर्वाधिक घसरलेलाे आहाेत. या देशांचा विषय येताे तेव्हा आम्ही आश्वस्त असताे. मात्र, पाकिस्तानची वेळ आली की भूमिकाच बदलते. त्यास अनुदार ठरवण्याचा आनंद घेण्याची इच्छा प्रबळ हाेते. खरे तर यामुळे आपण त्याच्याशी बराेबरी करत असल्याचेच प्रतीत हाेत नाही का? जर पाकिस्तानशी आम्ही बराेबरी करीत असू तर ताे आपलाच अवमान नव्हे का? जरा या वस्तुस्थितीकडे लक्ष द्या. भारतीय अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत १० पट आहे. पाकिस्तानचा जीडीपी महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. भारत आजही प्रजासत्ताक (यातील साऱ्या दाेषांसह) आहे. पाकिस्तान कधीही एक देश बनू शकला नाही. घटनेनुसार आम्ही धर्मनिरपेक्ष आहाेत. ताे अधिकृतरीत्या धार्मिक देश आहे. या वास्तवाचा विचार करता आर्थिक, लाेकसंख्या, राजकारण किंवा सामाजिक समानतेच्या काेणत्याही मुद्द्यावर पाकिस्तान भारताची बराेबरी करू शकत नाही. असे असताना दरराेज रात्री टीव्हीला चिकटून राहणे कुणाला आवडेल? या मनाेवृत्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की, हे आमच्यासाठी इतके महत्त्वपूर्ण का आहे? १) अन्य काेणत्याही शेजारी देशाच्या तुलनेत आमच्यासाठी निराळ्या पातळीवरच्या अडचणी निर्माण करताे. २) सततची खुन्नस आणि भारतीय जनजीवनात फूट पाडण्याच्या भूमिकेकडे डाेळेझाक करता येत नाही. एक लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना आपल्याशी तुलना हवी आहे. आम्हाला खिजवून, चिडवून स्वत:ला भारताच्या बराेबरीचे सिद्ध करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असताे. एक मच्छर एखाद्या हत्तीला अस्वस्थ करून त्याच्या बराेबरीचा ठरू शकत नाही. परंतु जर हत्तीने संयम साेडला तर ताे डासाला ताळ्यावर आणू शकताे. पाकिस्तानविषयीच्या आमच्या मनाेवृत्तीचे दुसरे कारण आहे, आपली भाषा आणि सांस्कृतिक समानता, विशेषत: उत्तर भारतीयांची. आमच्यासारखे दिसणारे, बाेलणारे, आहार करणारे, चित्रपट पाहणारे आणि संगीत एेकणारे इतके आमचे विराेधी असू शकतात, हे आश्चर्यजनक नाही का? या समानतेपासून दूर हाेणे कठीण असले तरी व्हावेच लागणार आहे. भारताला जर प्रगती करायची असेल तर कुणाशीही तुलना करणे थांबवावे लागेल. जर तुलनाच करायची असेल तर चीन, युराेप आणि अमेरिकेशी केली पाहिजे. पाकिस्तानची निर्मिती हाच घाईने घेतलेला निर्णय हाेता. भारतीय इतिहासात ताे सर्वात माेठा सांप्रदायिक निर्णय हाेता. चाैथे कारण म्हणजे, पाकिस्तानचा द्वेष करून अप्रत्यक्षपणे भारतीय मुस्लिमांचा द्वेष करणे. आत्मसन्मान असणारा कुणीही भारतीय खुलेआम मुस्लिमांवर दाेषाराेप करणार नाही, मात्र पाकिस्तानला टाेमणे मारत राहणार. एकाअर्थी हे राष्ट्रप्रेमाचे लक्षण आहे. इतरांवर ठपका ठेवण्यात देशभक्ती कशी? आपल्या देशासाठी उच्च प्रतीचे उद्दिष्ट निश्चित करणे, ते गाठण्यासाठी प्रयत्न करीत राहण्यात देशभक्ती आहे. पाकिस्तानविषयी भारतीयांमध्ये उदासीनता अधिक आहे. पाकिस्तानविषयीची आपली मनाेवृत्ती बदलण्याचा आणि स्वत:वर अधिक लक्ष देण्याचा हा काळ आहे. म्हणूनच पाकिस्तानला आम्ही तेच दिले पाहिजे, जे मिळवण्याचा ताे धनी ठरताे म्हणजेच उदासीनता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.