Home | International | Pakistan | pakistan isi chief warned america

अमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवावेत अन्यथा प्रतिहल्ले - पाक

Agency | Update - May 23, 2011, 03:03 PM IST

अमेरिकेने आदिवासी पट्ट्यात ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर पाकिस्तान त्याला जशास तसे प्रत्त्युत्तर देईल अशी धमकी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली आहे.

  • pakistan isi chief warned america

    इस्लामाबाद - अमेरिकेने आदिवासी पट्ट्यात ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर पाकिस्तान त्याला जशास तसे प्रत्त्युत्तर देईल अशी धमकी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली आहे.

    अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचे उपसंचालक मायकेल मॉरेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाशा यांनी हा इशारा दिला आहे. तुम्ही ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर आम्हालाही प्रत्त्युत्तर देण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा शब्दात पाशा यांनी मॉरेल यांना सांगितल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्युन ने दिले आहे. पाकिस्तानच्या वायू हद्दीत घुसून नाटोच्या हेलिकॉप्टरसर्नी हल्ले केले होते. या घटनांची आठवण करुन देत यामुळे उभय देशांमधील संबंधांना तडा गेल्याचे पाशा यांनी सांगितले. मॉरेल यांनी आयएसआय अधिकारी आणि दहशतवाद विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांशीही भेट घेतली. दहशतवाद्यांविरोधात आणि ड्रोन हल्ले रोखण्यासंदर्भात संयुक्त कारवाई करण्याविपयीही चर्चा झाली.

Trending