आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षीय शीख मुलीवर अॅम्ब्युलेन्समध्ये बलात्कार, शोधायला गेलेल्या कुटुंबाने आरडाओरड ऐकून वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क/ इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सरकारी अॅम्बुलन्समध्ये 15 वर्षीय शीख मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलगी गतिमंद आहे. ती शनिवारी ननकान शहराच्या गुरुद्वाऱ्यातून बेपत्ता झाली होती. तिला शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबीयांना एका अॅम्ब्युलेन्समधून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तिकडे धाव घेऊन त्यांनी मुलीला नराधमांच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी अॅम्बुलन्सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

 

पीडितेचे वडिलांनी सांगितला घटनाक्रम... 
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी घरी परतली नाही म्हणूनआमी पोलिस तक्रार केली आणि स्वत:ही तिच्या शोधासाठी बाहेर पडलो. यादरम्यान शहराच्या बायपासवर पंजाब इमर्जन्सी सर्व्हिस रेस्क्यू 1122 ची एक अॅम्बुलन्स उभी होती. आतून मुलीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आम्ही धावत जाऊन पोहोचलो तेव्हा दोन जण तिच्यावर दुष्कर्म करत होते. यानंतर आरोपी तेथून पळून गेले आणि जवळजवळ दोन किमी दूर मुलीला अॅम्बुलन्समधून बाहेर फेकून दिले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती, यामुळे ती जसजशी मोठ होत होती, आम्हाला तिच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली होती.

 

दोन्ही अॅम्ब्युलेन्स कर्मचारी निलंबित...
पोलिस अधिकारी नदीम अहमद म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अॅम्बुलन्स सर्व्हिसच्या 2 कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिस पथकाने छापेमारी करत आरोपी एहसान अली आणि समीर हैदरला अटक केली. पीडितेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते मुहम्मद फारूक म्हणाले की, याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच चौकशीसाठी विभागीय समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...