Home | International | Pakistan | pakistan-navy

पाकिस्तानी नौदलात अल कायदाचे दहशतवादी, भारताला धोका वाढला

agencies | Update - May 30, 2011, 10:27 AM IST

पाकिस्तानला अल कायदापासून धोका आणखी वाढला आहे. पाकिस्तानच्या नौदलामध्ये अल कायदाचे दहशतवादी घुसले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

  • pakistan-navy

    पाकिस्तानला अल कायदापासून धोका आणखी वाढला आहे. पाकिस्तानच्या नौदलामध्ये अल कायदाचे दहशतवादी घुसले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी भारतालाही धोका वाढला आहे. आतापर्यंत गुप्तचर संस्था आयएसआयचे दहशतवाद्यांसोबत लागेबांधे असल्याचे आरोप होत होते. आता पाकिस्तानच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे उघड झाले आहे.
    पाकिस्तानी नौदलाच्या मेहरान तळावर अल कायदाच्याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. या हल्ल्याच्या तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे. नौदलामध्ये अल कायदाबाबत सहानुभूती बाळगणारे अधिकारी आहेतच, शिवाय खुद्द अल कायदाचे दहशतवादीही नौदलात आहेत. हे दहशतवादी अधिकारी म्हणून भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यावरुनच नौदलाच्या अधिकाऱ्यांचे या दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचे स्पष्ट होते. नौदलामध्ये अल कायदाचे किती दहशतवादी भरती झाले आहेत आणि त्यांचे कोणाकोणासोबत संबंध आहेत, याचा तपास सुरु आहे. परंतु, या घटनेमुळे भारतासोबतच इतर देशही सावध झाले आहेत.

    आपले मत
    ही माहिती उघड झाल्यानंतर पाकिस्तानवर विश्वास ठवेता येऊ शकतो का? आपले मत खाली दिलेल्या कॉमेन्ट बॉक्समध्ये लिहून व्यक्त करा. कोणत्याही आपत्तीजनक मतासाठी वाचक स्वत: जबाबदार असतील.

Trending