National / पाकिस्तानने 139 दिवसानंतर हवाई मार्ग केला मोकळा, एअर स्ट्राईकनंतर भारतीय विमानाना पाकिस्तानातून उडण्यास लावले होते निर्बंध


पाक एअरस्पेस बंद झाल्यामुळे एअर इंडियाला 491 कोटी रुपयांचे नुकासान होत होते

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 04:00:00 PM IST

नवी दिल्ली- पाकिस्तानने 139 दिवसानंतर भारतीयांसहित इतर विमानांसाठी आपला हवाई मार्ग सोमवारी रात्री 12.41 वाजात मोकळा केला. भारतीय हवाई विभागाने प्रकरणाचे पुनरावलोकन केले आणि आता दोन्ही देशांमध्ये हवाई प्रवास सुरू झाला. भारतीय वायुसेनेने पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशदवादी शिबीरांवर एअर स्ट्राइक केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हाच पाकिस्तानने एअर स्पेस बंद केला होता.

एअर स्पेस बंद झाल्यानंतर युरोप आणि आखाती देशांकडे जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट गुजरातवरुन अरबी समुद्र पार करून जात होत्या. मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एससीओ समिटमध्ये भाग घेण्यासाठी किर्गिस्तानला जायचे होते. तेव्हा पाकिस्तानने 48 तासांसाठी आपला हवाई मार्ग मोदींसाठी मोकला केला होता, पण मोदींना पाक एअर स्पेसचा वापर केला नव्हता.


एअर इंडियाला 491 कोटींचे नुकसान
पाकिस्तान सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने एअर स्पेसवर लागलेल्या निर्बंधांना हटवले आहे. पाक एअरस्पेस बंद बंद झाल्यानंतर एअर इंडियाला 491 कोटी रुपयांचे नुकासना सोसावे लागले आहे. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या डेटानुसार यामुळे दररोज अंदाजे 233 विमानातील 70 हजार प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी दिढ ते दोन तास उशीर होत होता.

X
COMMENT