आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे पंतप्रधान इम्रान फ्लॅटमध्येच राहणार; केवळ २ वाहने, २ जणांचा स्टाफ असेल सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान निवास सोडून ३ बेडरूमच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास गेले आहेत. कामही तेथूनच पाहतील. कुटुंबीयांना भेटण्यासाठी दर रविवारी जुन्या घरी जातील. त्यांच्याकडे असलेल्या ८० पैकी केवळ २ कार स्वत:जवळ ठेवणार आहेत. बाकी सर्व गाड्यांचा लिलाव होईल. यातून मिळणारा निधी देशहिताच्या कामासाठी लावला जाणार आहे. देशाला संबोधित करताना इम्रान यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. 


पाकमधील पंतप्रधान निवास एक लाख चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर बांधले गेले आहे. पंतप्रधानांच्या दिमतीला ५२४ लोकांचा खासगी स्टाफ आहे.  ८० गाड्यांच्या ताफ्यात ३३ बुलेटप्रूफ कार आहेत. निवासस्थानाच्या आवारातील हेलिपॅडवर २ ते ३ हेलिकॉप्टर उभे असतात. हा सर्व पैशाचा अपव्यय असून आता लष्कर सचिवांच्या ३ बेडरूमच्या घरात दोन लोकांसोबत राहणार असल्याचे इम्रान यांनी पद सांभाळताच म्हटले. पीएमच्या घराला जागतिक स्तरावरील संशोधन विद्यापीठ बनवण्याची आमची योजना असल्याचे ते म्हणाले. विनाकारण होत असलेल्या सरकारी खर्चाला आळा घालण्यासाठी एक समिती बनवण्यात येईल व विकासासाठी पाकिस्तानची कर्ज घेण्याची सवय  बंद करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...