आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीसोबत ठुमके लावणारा पाकिस्तानचा पोलिस अधिकारी झाला व्हायरल, Video पाहून वरिष्ठांनी केली ही कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात एका पोलिस अधिकाऱ्याला बॉलिवूड प्रेम महागात पडले आहे. बॉलिवूडच्या एका गाण्यामुळे या पोलिस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट आले आहे. हा पोलिस अधिकारी गोविंदाच्या 'किसी डिस्को मे जाएं' या गाण्यावर एका तरुणीसोबत ठुमके लावत होता. त्याने आपल्या ठुमक्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जो देश-विदेशात व्हायरल झाला. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या बॉलिवूडवेड्या पोलिसावर कारवाई केली.


पाकपट्टण जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत अरशादने टिक-टॉकवर एक व्हिडिओ अपलोड केला. यात तो एका महिलेसोबत गोविंदाच्या गाण्यावर ठुमके लावताना दिसून आला. त्याचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला. त्यांनी एक-एक करून व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आणि पाहता-पाहता तो व्हायरल झाला. हाच व्हिडिओ पंजाब प्रांतातील पाकपट्टण पोलिस स्टेशनमध्ये तैनात मारिया महमूद या पोलिस प्रमुखापर्यंत पोहोचला. आपला ज्युनिअर पाक पोलिस विभागाची कुप्रसिद्धी करत असल्याचा आरोप लावून त्यांनी अरशादला बोलावून घेतले. तसेच शिस्तभंगाचे कारण दाखवून त्याचे निलंबन केले.

बातम्या आणखी आहेत...