आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pak / अमेरिका दौऱ्यात पैसे वाचवण्यासाठी महागड्या हॉटेलात नव्हे, राजदूताच्या घरी थांबणार पाकिस्तानचे पंतप्रधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात सुद्धा देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशात पैसे वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक नवीनच शक्कल लढवली. त्यानुसार, ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर ते हॉटेलात थांबणार नाहीत. अमेरिकेतील हॉटेलचा खर्च पाकिस्तान सरकार पूर्ण करू शकणार नाही. अशात पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूताच्या शासकीय निवास स्थानी थांबण्याचा प्रस्ताव दिला आहे. येत्या 21 जून रोजी इम्रान खान तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत.


पाकिस्तानी न्यूज वेबसाइट डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान खान अमेरिकेतील राजदूत असद मजीद यांच्या घरी थांबणार आहेत. त्यांनी हा निर्णय देशाचा पैसा वाचवण्यासाठी घेतला आहे. अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस किंवा स्थानिक प्रशासनाने यावर अधिकृत मंजुरी अद्याप दिलेली नाही. तरीही अमेरिकन प्रशासनाला यात काहीच अडचण येणार नाही अशी अपेक्षा पाकिस्तान करत आहे.


यामुळे परवानगी नकारली जाण्याची शक्यता...
> अमेरिकेला जगातील सर्वात प्रभावी राष्ट्र मानले जाते. दरवर्षी या देशात शेकडो पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष दौरे करत असतात. अशात त्यांच्या ट्रॅफिक रूट आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस एजंसीची असते. कुठल्याही देशाचा नेता अमेरिकेत दाखल होताच सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होतात. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून त्यांच्या ट्रॅफिक रूट आणि इतर सुविधांची काळजी घेतली जाते.
> अमेरिकेत किंवा इतर कुठल्याही देशात परदेशी नेत्याने दौरा केल्यास त्यांच्या भेटी घेण्यासाठी राजकीय नेते, अधिकारी आणि उद्योजकांसह अनेक मान्यवर सुद्धा येत असतात. इम्रान खान ज्या राजदूतांच्या घरात थांबण्यास इच्छुक आहेत ते या लोकांच्या भेटी घेण्यासाठी खूप छोटे आहे. सोबतच, राजदूतांचे घर वॉशिंग्टन डीसीच्या मध्यभागी आहे. याच दूतावासाच्या शेजारी भारतासह विविध देशांचे राजदूत असतात. त्या सर्वच गोष्टींचा अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक प्रशासनाला विचार करावा लागणार आहे. परंतु, पैसे वाचवण्याच्या नादात इम्रान खान अमेरिकेत जेवणही ऑनलाईन ऑर्डर करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो.