आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान यांची मैत्रीची भाषा;पण दहशतवादी पाठवणे सुरूच: पाक पंतप्रधानांचे कूटनीतिपूर्ण वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करतारपूर - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी भारत व पाकिस्तान यांच्या मैत्रीवर भर दिला. इम्रान म्हणाले, शत्रुत्व विसरून मैत्रीच्या मार्गावर वाटचाल करावी लागेल. एकीकडे पाकिस्तान मैत्रीबद्दल बोलतोय, दुसरीकडे काश्मीरमधील दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये हल्ला केला होता. तेव्हापासून उभय देशांत किमान दहशतवादाच्या मुद्द्यावर तरी द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. यंदा भारताने रमजानच्या महिन्यात दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाची मोहीम रोखली होती. २९ मे रोजी भारत व पाकिस्तानच्या डीजीएमआे पातळीवर २००३ चा करार प्रभावीपणे लागू करण्यावर सहमती झाली होती.

 

त्यानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या मदतीने घुसखोरीचा प्रयत्न केला.  हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले. सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. काश्मीरमध्ये अस्थैर्य वाढले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चाही झाली नाही.

 

मोदींनी शरीफांना शांती संदेश दिला, उत्तर उरी हल्ल्याने मिळाले होते

२६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी समारंभात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शांततेचा संदेश दिला. ३ मार्च २०१५ रोजी भारत-पाकिस्तान परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा झाली. २०१२ नंतरची ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा होती. १० जुलै २०१५ रोजी मोदी-शरीफ यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत भेट झाली होती.

 

दहशतवादाच्या विरोधात दोन्ही देश मिळून लढतील, असे संयुक्त वक्तव्य तेव्हा दोन्ही नेत्यांनी जारी केले होते. भारताने २३ जुलै २०१५ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन एनएसए सरताज अजीझ यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. अजीझ हुर्रियतला बैठकीत सहभागी करण्यावरून अडून बसले. त्यामुळे ऑगस्टमधील प्रस्तावित बैठक रद्द झाली. ८ डिसेंबर २०१५ रोजी सुषमा स्वराज यांनी इस्लामाबादमध्ये अजीझ व शरीफ यांची भेट घेतली. १८ व १९ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर उभय देशांतील चर्चा बंद झाली आहे. 

 

घुसखोरीमुळे काश्मिरात अस्थैर्य वाढले, दक्षिणेकडील भागाचे सर्वाधिक झळ

काश्मीरमध्ये यंदा दहशतवादी हल्ल्यांच्या विविध घटनांत ४०० लोकांना प्राण गमावावे लागले. गेल्या दहा वर्षांत दहशतवादी हल्ल्यांत मृत्यू झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. २००८ मध्ये सर्वात जास्त ५०५ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये जम्मू-काश्मीर पोलिस, त्यांचे नातेवाईक, स्थानिक लोकांचा समावेश आहे. अनेक नेते व पत्रकारांवर हल्ले झाले. २०१२ मध्ये दहशतवादी घटनांत सर्वात कमी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावर्षी ९९ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातून काश्मीरमध्ये अस्थैर्य वाढले आहे. दक्षिण काश्मीरला त्याची जास्त झळ बसली आहे. पाकिस्तानातून घुसखोरी होते. 

 

दहशतवाद्यांना मदत केल्यावरून अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत केली बंद 

अमेरिकेने एक आठवड्यापूर्वी पाकिस्तानला दिली जाणारी १.६६ अब्ज डॉलरचे (११ हजार ७२३ कोटी रुपये) सुरक्षा सहकार्य बंद केले. दहशतवाद्यांच्या विराेधातील कारवाईत अयशस्वी ठरल्यामुळे अमेरिकेने पाकच्या विरोधात हा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सातत्याने हल्ले केले आहेत. वारंवार केले जाणारे हल्ले सहन केले जाऊ शकत नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले हाेते. आमच्या देशाला दहशतवाद्यांच्या लढण्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे इम्रान यांनी म्हटले होते. इतर देशासाठी पाक आता दहशतवाद्यांसाठी मुळीच लढणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...