ICC world cup / टीम इंडियाच्या पराभवाने पाकिस्तान आला अडचणीत, इंग्लंडचे पुनरागमन

क्रिस वोक्सने सीमेवर ऋषभ पंतचा शानदार झेल टिपला. क्रिस वोक्सने सीमेवर ऋषभ पंतचा शानदार झेल टिपला.

भारताला दोनपैकी एक सामना जिंकावा लागणार, अन्यथा रनरेटवर निर्णय
 

वृत्तसंस्था

Jul 01,2019 08:02:00 AM IST

बर्मिंगहॅम - इंग्लंडने भारताला ३१ धावांनी हरवून उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडचा हा ५वा विजय असून ३ जुलैला इंग्लंडने आपल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडला हरवले तर तो उपांत्यफेरीत पोहचेल. दुसरीकडे पाक स्पर्धेतून बाद होईल. भारताचे ११ गुण असून त्याच्या २ जुलैला बांगलादेश व ६ रोजी लंकेशी लढती शिल्लक आहेत. एक सामना जरी जिंकला तरी भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. टीम इंडिया ११ गुणांवरच उपांत्य फेरी गाठू शकतो. परंतु, या ठिकाणी रनरेट महत्त्वाचा असेल.

नवे समीकरण

इंग्लंडचे ८ सामन्यांत १० आणि पाकचे ८ सामन्यांत ९ गुण आहेत. दोघांचे एक-एक सामने शिल्लक आहेत. इंग्लंडच्या विजयामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद झाला. आता ४ संघ नॉकआऊटमधून बाहेर पडले आहेत.

पाकला आता इंग्लंडच्या पराभवाची वाट पाहावी लागेल

इंग्लंड : किवीज विरुद्ध सामना शिल्लक : जिंकला तर उपांत्य फेरीत. हरला तर मात्र पाक बांगलादेशकडून पराभूत होण्याची वाट पाहावी लागेल.

पाक : बांगलादेशशी सामना शिल्लक :

जिंकला तर इंग्लंड किवीजकडून पराभूत होण्याची वाट पाहावी लागेल. हरला तर बाहेर. मग इंग्लंड हरला तरी उपयोग नाही.

बांगलादेश : दोन्ही सामने जिंकले आणि इंग्लंड हरला तर उपांत्य फेरीत

भारत-पाकिस्तानशी सामने शिल्लक : बांगलादेश यापैकी एक सामना जरी हरला तर बाहेर पडेल. मात्र, दोन्ही सामने जिंकले आणि इंग्लंडही न्यूझीलंडकडून पराभूत झाला तर बांगलादेश उपांत्य फेरीत.

रोहितच्या २५ पैकी पहिले शतक ज्यात षटकारच नाही

> रोहितने या वर्ल्डकपमधील तिसरे शतक झळकावले. मात्र यात एकही षटकार नाही. त्रिशतकी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.
> कोहलीने ६६ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये सलग ५ सामन्यांत ५०+ धावा करणारा तो पहिला कर्णधार ठरला. वनडेमध्ये कोहलीने तीन वेळा ही कामगिरी केली आहे.

X
क्रिस वोक्सने सीमेवर ऋषभ पंतचा शानदार झेल टिपला.क्रिस वोक्सने सीमेवर ऋषभ पंतचा शानदार झेल टिपला.
COMMENT