आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Saqlain Mushtaq Hails Rahul Dravid, Says Only Team India Can Beat Australia In Their Home Ground

'राहुल द्रविडला सलाम, तो भारतासाठी हिऱ्यांना पैलू पाडतोय; विराट क्रिकेटवर राज्य करतोय'- सकलैन मुश्ताक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात फक्त भारतच हरवू शकतो'

स्पोर्ट डेस्क- जगातील सर्वोत्तम ऑफ स्पिनर्सपैकी एक पाकिस्तानच्या सकलैन मुश्ताकने भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडला नमन केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सकलैन म्हणाला की- "राहुलच तो व्यक्ती आहे, जो भारताला उत्कृष्ट खेळाडू देऊ शकतो. मी त्याला नमन करतो." मुश्ताकने एक पूर्ण एपिसोड राहुल द्रविडबद्दल बोलत, त्याला समर्पित केला. सकलैन मुश्ताक इंग्लँडचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते.

'ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात हरवण्याची ताकत फक्त भारतात'
 
सकलैनने इंग्लँडचा माजी कर्णधार मायकलच्या नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यूचा आधार देत सांगितले की, "मायकल वॉन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाला फक्त भारतच त्यांच्या घरात जाऊन हरवण्याची क्षमता ठेवतो. इतर क्रिकटर्स आणि जानकारांचेही मत आहे की, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात हरवण्याची क्षमता फक्त भारतीय खेळाडूंमध्येच आहे. भारताकडे विराट कोहली आहे, जो सध्या संपूर्ण क्रिकेटवर राज्य करतोय. " 

राहुल द्रविडचे रेकॉर्ड
 
मुश्ताक पुढे म्हणाले की, "जेव्हा मी याच्या खोलाज जाऊन अभ्यास केला, तेव्हा मला समजले. भारतात एकच व्यक्ती आहे, जो नवीन टॅलेंटेड खेळाडूंना समोर आणतोय. तो भारतासाठी हिऱ्यांवर पैलू पाडायचे काम करत आहे. हा दुसरा-तिसरा कोणी नसून ‘द वॉल’ म्हणजेच राहुल द्रविड आहे. त्याने 164 टेस्टमध्ये 52.31 च्या सरासरीने 13288 रन बनवले आहेत. तसेच, 36 शतक आणि 63 अर्धशतक लगावले आहेत. वनडेमध्येही त्याने 344 सामन्यात 39.16 च्या सरासरीने 10889 रन बनवले आहेत, त्यात 12 शतक आणि 83 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत."
 

बातम्या आणखी आहेत...