आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची केली सुटका; राजस्थान सीमवेर अतिरिक्त सैनिक केले तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयबीने जम्मू आणि राजस्थान सीमेवर दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ल्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.  मीडिया रिपोर्टनुसार आयबीच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की,  पाकिस्तानचे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरची तुरुंगातून सुटका केली आहे. सोबतच पाकिस्तानने जम्मू आणि राजस्थान भागात सीमेवर आपले अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरोधातील दहशतवादी कारवाईंसाठी मसूद अझरचा वापर करण्याची शक्यता आहे. 
 

सीमेवर अलर्ट जारी 
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर सीमेवरील घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचत आहेत. आयबीने राजस्थान-जम्मू सीमेवर तैनात बीएसएफ आणि लष्कर अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला आहे. 
 

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता अझहर 
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामागे मसूद अझहर हात होता. यानंतर मसूद अझहरला अटक व्हावी यासाठी भारताने महत्त्वाची पावले उचलली होती. यानंतर पाकिस्तानने मसूद अझहरला अटक केल्याचे सांगितले होते. मात्र आता पाकिस्तानने त्याची सुटका केल्याचे वृत्त समोर येत आहे. .

बातम्या आणखी आहेत...