Pak / पाकिस्तानमध्ये शीख धर्मगुरूंच्या मुलीचे अपहरण करून धर्मांतर, कुटुंबीयांनी इम्रान खानकडे मदत मागितली

मुलीला धमकावून मुस्लीम बनवण्यात आले - भाऊ

दिव्य मराठी वेब

Aug 30,2019 02:38:57 PM IST

ननकाना साहिब : पाकिस्तानमध्ये एका शीख मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचे धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर तिचे मुस्लीम तरुणाशी लग्न लावून देण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, 27 ऑगस्टच्या रात्री काही हत्यारबंद लोक घरात घुसले आणि बंदुकीचा धाक दाखवून मुलीला घेऊन गेले. पाकिस्तानमध्ये हिंदू तरुणींचं अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.


शिरोमणी अकाली दलचे आमदार मानजिंदर सिंह सिरसा यांनी गुरुवारी मुलीच्या कुटुंबीयांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, "पाकिस्तानमधील शीख इम्रान खानकडे मदत मागत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर याना विनंती करतो की मुलींचे जबरदस्ती धर्मांतर करण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला जावा. पाकिस्तानमध्ये शीख धर्माला धोका निर्माण झाला असल्यामुळे हा मुद्दा संयुक्त राष्ट्रासमोरही उपस्थित करण्यात यावा."


मुलीला धमकावून मुस्लीम बनवण्यात आले - भाऊ
स्वतःला मुलीचा भाऊ सांगत असलेला मनमोहन सिंहने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, "अपहरण केलेली मुलगी माझी बहीण आहे. तिला धमकी देण्यात आली होती की, मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर तुझ्या वडिलांची आणि भावाची हत्या केली जाईल. मी पंतप्रधान इम्रान खान आणि आर्मी चीफ कमर जावेद बाजवा यांच्याकडे मदतीची विनंती करतो."

X
COMMENT