आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक म्हणाला: अंतराळात मानव पाठवू, पाकिस्तानी म्हणाले : नवाज आणि हाफिज सईदला पाठवा, तुरुंगाचा खर्च वाचेल, घाण साफ होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील यशाने चडफडणाऱ्या पाकिस्तानने २०२२ पर्यंत आपल्या नागरिकाला अंतराळात पाठवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी गुरुवारी या संदर्भातील टि्वट केले तर पाकिस्तानी लोकांनी टि्वटरवरच त्यांची चेष्टा करणे सुरू केले. मीर मोहंमद अलीने टि्वट केले, मी काही लोकांचे नामांकन देऊ इच्छितो. मात्र, तुम्हाला वचन द्यावे लागेल की त्यांना परत बोलावले जाणार नाही. एक युजर सिदराने लिहिले, प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. नवाज शरीफ, अासिफ झरदारी आणि हाफिज सईद यांना अंतराळात पाठवा. यामुळे तुरुंगाचा खर्च वाचेल आणि घाणही साफ होईल. हादिया नूर लिहिते की, आपण जगभरातून कर्ज घेतले आणि तुम्ही,जनतेला खुश करण्यासाठी विनोद करत आहात. वहीद अहमदने म्हटले, सर्वप्रथम देशातील गरिबी हटवा, त्यानंतर अंतराळाच्या गोष्टी करा. काहींनी अंतराळात जाण्यासाठी स्वत:च्या नावाचा प्रस्ताव टि्वटरवर दिला. 


ही आमची आजवरची सर्वात मोठी मोहीम राहील : मंत्री 
पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणाले की, एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला प्रथमच अंतराळात पाठवण्याची प्रक्रिया फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू होईल. ५० निवडक लोकांची यादी केली जाईल, त्यातून पुन्हा २५ जणांची निवड होईल आणि प्रथमच मानवाला अंतराळात पाठवले जाईल. ही आजवरची सर्वात मोठी अंतराळ मोहीम राहील.


अशी केली चेष्टा 
- आधी वैज्ञानिक यश तर सांगा? आणि हेही की कोणत्या मोहिमेवर किती खर्च होईल ? 
-गुल बुखारी, पाकिस्तानी पत्रकार
- आमच्याकडे स्विमिंग पूल नाही त्यामुळे आम्ही जंगलात जाऊन बुडू, मात्र अाम्ही बुडणार. 
- सलमान हैदर, सामाजिक कार्यकर्ता
- असे करण्यात यशस्वी ठरलो तर कोट्यवधींची मने जिंकू, मात्र यावर आता यू टर्न घेऊ नका 
- डॉ. आयेशा सिद्दिकी, पेशावर 
- २०२२ ची प्रतीक्षा कशासाठी ? देशाचे नाव सॅटेलाइटवर लिहा आणि चीनकडे पाठवून द्या 
-मुरलीकृष्णा, चेन्नई येथील विद्यार्थी