Ind - Pak / विश्वचषकातील सर्वात हायव्हाेल्टेज सामना आज; ‘पाक संघ पलटवार करू शकतो, चॅम्पियन्स चषक विसरू नका’

आज बहुतांश क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघ हा पाकिस्तान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम आहे

विशेष प्रतिनिधी

Jun 16,2019 09:23:00 AM IST

आयसीसीने मागील वर्षी १४ देशांचे सर्वेक्षण केले हाेते, ज्यात चीन - अमेरिकेसारखे देशही हाेते. जगामध्ये जवळपास एक अब्ज क्रिकेट फॅन असून त्यातील ९० % फॅन भारतीय उपमहाखंडातील असल्याचे यात समजले. आज बहुतांश क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघ हा पाकिस्तान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम आहे. परंतु पाकिस्तानचा संघ अनप्रेडिक्टेबल असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. २०१७ मधील चॅम्पियन्स चषकाच्या वेळी पाकिस्तानी संघ कमकुवत हाेता. पहिल्या सामन्यात तो भारताकडून पराभूत झाला, पण शेवटी त्यांनी स्पर्धा जिंकली. भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची दाेन्ही देशांमध्ये क्रिकेट व्हावे अशी इच्छा आहे, पण ते त्याकडे खेळाच्या नजरेतून बघत नाहीत. ते एखादे युद्ध किंवा मुष्टियुद्धाच्या खेळासारखे बघतात. गेल्या अनेक वर्षांपासून दाेन्ही संघ एकमेकांच्या देशात क्रिकेट खेळत नाहीयेत. परंतु त्यांच्यावर ३०० पेक्षा जास्त वर्षे राज्य केलेल्या एका तिसऱ्या देशाच्या ठिकाणी जाऊन खेळायला तयार आहेत. हे एक प्रकारचे ढाेंग नाही का ? या सामन्यासाठी मी इंग्लंडला तर गेलाे नाही, पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम विश्वचषक स्पर्धा झाली तर जरूर जाईन. सामना काेणीही जिंकाे, मी नृत्य करणार. जर आज भारत जिंकला तर त्यांच्या संघाचे मी जाहीर अभिनंदन करेन.

X
COMMENT