आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान टीमचा यजमान इंग्लंड संघावर १४ धावांनी शानदार विजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाॅटिंघम - विंडीजविरुद्ध सामन्यातील लाजिरवाण्या पराभवातून सावरलेल्या पाकिस्तान संघाने विश्वचषकात  दमदार पुनरागमन केले. १९९२ च्या विश्वविजेत्या पाकने यंंदाच्या स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. पाकिस्तान संघाने १४ धावांनी सामना जिंकला. यासह पाकने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले, तर यजमान इंग्लंडच्या विजयी माेहिमेला ब्रेक लागला. 


पाकने साेमवारी यजमान इंग्लंडविरुद्ध सामन्यात ८ गड्यांच्या माेबदल्यात ३४८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या ३३४ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडकडून जाेस बटलर (१०७) आणि ज्याे रुटने (१०३) शानदार शतकी खेळी केली. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता आला नाही. 


यासह पाकला विश्वचषकाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या सर्वात माेठ्या स्काेअरची नाेंद आपल्या नावे करता आली. यापूर्वी पाकने २००७च्या  वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३४९ धावा काढल्या हाेत्या. तसेच वर्ल्डकपमध्ये पाचव्यांदा पाकच्या टीमला ३००+ च्या धावसंख्येची नाेंद करता आली. 


आता यजमान इंग्लंडविरुद्ध सामन्यात पाकच्या फलंदाजाची कामगिरी दर्जेदार राहिली. यातूनच पाकच्या तीन फलंदाजांनी शानदार अर्धशतके साजरी केली. यात माे. हाफिजसह (८४), बाबर आझम (६३) आणि कर्णधार सर्फराज अहमदचा (५५) समावेश आहेे.़


इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकच्या सलामीवीर इमाम-उल-हक (४४) आणि फखर झमान (३६) या जाेडीने चांगली सुरुवात केली. त्यांनी संघाला १४ षटकांत ८२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर बाबर आझम, सर्फराज आणि हाफिजने संघाचा डाव सावरला. त्यांनी झंझावाती अर्धशतकी खेळी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. पाकने शेवटच्या १० षटकांत आपल्या पाच विकेट गमावल्या. मात्र, यातून ९६ धावांची कमाई केली. यजमान इंग्लंड संघाकडून गाेलदंाजीत क्रिस वाेक्स आणि माेईन अली चमकले. त्यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 
 

 

> यजमान इंग्लंड संघाच्या ज्याे रुटने यंदाच्या विश्वचषकात शतकी खेळी केली. याच खेळीच्या आधारे आता यजमान इंग्लंडचा संघ यंदाचा विश्वविजेता हाेण्याची संकेत मिळाले. कारण, आतापर्यंत या पहिल्या शतकाच्या खेळीला चॅम्पियन हाेण्याचा माेठा वारसा लाभला आहे. २००७ मध्ये पाँटिंगने पहिले शतक ठाेकले आणि ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. २०११ मध्ये सेहवागने पहिले शतक झळकावले आणि भारताचा संघ किताबाचा मानकरी ठरला. तसेच २०१५ मध्ये फिंचने शतकाचे खाते उघडले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. 

 

टर्निंग पॉइंट

> २४.१ षटकांत हाफिजला जीवनदान. जेसन राॅयने झेल साेडला. तेव्हा हाफिज १४ धावांवर हाेता. त्यानंतर ८४ धावांची खेळी.
> जाेफ्रा आर्चरला सुरुवातीपासून हिट करण्याचा डावपेच यशस्वी ठरला. त्याच्या पहिल्या चार षटकांत २५ धावा. यात समाधानकारक खेळीत अपयशी ठरला. 
> आदिल रशीदला उशिरा गाेलंदाजीचा माॅर्गनचा गेमप्लॅन अपयशी ठरला. त्याने २३ ओव्हरनंतर गाेलंदाजी केली. त्याने पाच षटकांत ४३ धावा दिल्या.

 

डेटा पॉइंट

> पाकने इंग्लंडविरुद्ध २४ दिवसांत चाैथ्यांदा ३००+ चा स्काेअर केला. अाेव्हरअाॅल अाठव्यांदा इंग्लंडविरुद्ध ३००+ धावांची नाेंद.
> ३४८ धावांचा पाकचा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात माेठा स्काेअर. यापूर्वी १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये २५० धावांचा सर्वाेत्तम स्काेअर हाेता.
>  हा विश्वचषकातील पहिला डाव, ज्या शतकाशिवाय सर्वात माेठ्या स्काेअरची नाेंद. यापूर्वी अाफ्रिकेने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये यूएईविरुद्ध शतकांशिवाय ३४१ धावा काढल्या.