Home | International | Pakistan | pakistan uses wing commander abhinandan's that video for advertisement

पाकिस्तानची खालच्या पातळीवरची खेळी, विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा जाहिरातीसाठी वापर

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 07:02 PM IST

"मौका-मौका" जाहिरातीने पाकिस्तानी चिडले

 • pakistan uses wing commander abhinandan's that video for advertisement

  इस्लामाबाद(पाकिस्तान)- भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. भारतीयांच्या "मौका-मौका" जाहिरातीने पाकिस्तानची सोशल मीडियावर चांगलीच नाचक्की केली. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा गैरवापर करुन नवीन जाहिरात तयार केली आहे. अभिनंदन यांच्या शौर्याचा पाकिस्तानने अपमान केल्याचा आरोप करत भारतीयांकडून पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.


  अभिनंदन यांना पाकिस्तानने जेव्हा अटक केले होते, तेव्हा काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही, असे अभिनंदन यांनी म्हणत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला होता. याचा व्हिडीओ देखील पाकिस्तानकडून शेअर करण्यात आला होता. पण विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी अभिनंदन यांच्याप्रमाणे एका व्यक्तीकडून अभिनय करुन घेत नवा व्हिडीओ तयार करण्यात आलाय. Pakistan’s Jazz TV ने हा व्हिडीओ रिलीज केलाय.


  अटक करुन अभिनंदन यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण "I’m sorry, I am not supposed to tell you this" असे सांगत अभिनंदन यांनी काहीही सांगण्यास नकार दिला होता. अभिनंदन यांच्या या शौर्याने भारतीयांची मने जिंकली, पण आतापर्यंत विश्वचषकात भारतासोबत कधीही न जिंकलेल्या पाकिस्तानने जाहिरातीचा अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार वापरल्याने टीका केली जात आहे.

  "मौका-मौका" जाहिरातीने पाकिस्तानी चिडले
  भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने 2015 च्या विश्वचषकात स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो रिलीज केला होता. ही "मौका-मौका" जाहिरात प्रचंड गाजली होती. यावर्षी हीच जाहिरात नव्या रुपात आली आहे. भारत-पाक सामना ज्या दिवशी आहे, त्याच दिवशी फादर्स डे आहे. त्यामुळे या जाहिरातीतून पाकिस्तानची फिरकी घेतली आहे. पाकिस्तानला विश्वचषकात भारतासोबत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानी शब्दांचे युद्ध जिंकण्यासाठी संघर्ष करत आहेत.

Trending