आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, राजौरीच्या LoC जवळ पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


श्रीनगर। जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. 

 

बारामुला येथील पोलिस चौकीवर ग्रेनेडचा हल्ला

तर दूसरीकडे, दहशतवाद्यांनी काश्मीर बारामुला जिल्ह्यातील सोपेर येथे मुख्य पोलिस चौकीवर ग्रेनेडचा हल्ला केला. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात घेराव टाकला असून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.  

  
  
भारतावर पुन्हा हल्ला होता कामा नये - अमेरिका 
अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानला दशतवादी संघटनांविरुद्ध ठोस, अचूक आणि निर्णायक कारवाई करावी तसेच आता भारतावर पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानसाठी ते योग्य नसेल अशी ताकीद दिली. अमेरिकेच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी व्हाइट हाउस येथे मीडियाशी बोलतांना सांगितले की, पाकिस्तानने 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लश्कर-ए-तोयबा' यासांरख्या दहशतवादी संघटनांवर निर्बंध लादण्यासाठी ठोस आणि निर्णायक कारवाई करावी. जेणेकरून परिसरातील तणाव कमी होऊन शांती राहिल.  

बातम्या आणखी आहेत...