WorldCup2019 / WorldCup2019/ पाकिस्तान-वेस्टइंडीज यांचा आज सामना, 8 वर्षांपूर्वी पाकने विंडीजविरूद्ध जिंकला होता शेवटचा सामना


पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीजविरूद्ध शेवटचा विजय 2011 मध्ये मिळाला होता

दिव्य मराठी वेब टीम

May 31,2019 12:53:21 PM IST

स्पोर्ट्स डेस्क- एकदिवसीय विश्वचषकातील आज दुसरा सामना पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात नॉटिंघममध्ये खेळला जाईल. पाकिस्तानची नजर टूर्नामेंटच्या इतिहासात विंडीजविरूद्ध चौथा विजय मिळवण्यावर असेल. वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीज आणि पाकिस्तान आतापर्यंत 10 वेळेस समोर आले आहेत. यात 7 सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान मागील वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीजविरूद्ध हारला होता. पाकीस्नानला विंडीजविरूद्ध टूर्नामेंटमधील शेवटाचा विजयी 2011 मध्ये मिळाला आहे. इंग्लंडच्या मैदानात वेस्टइंडीज आणि पाकिस्तानच्या प्रदर्शनाबद्दल सागांयचे झाले तर, दोन्ही संघाने आपल्या- आपल्या सामन्यात मागील 5 मॅचमध्ये विजय मिलवला आहे.


दोन्ही संघ

पाकिस्तान- सरफराज अहमद (कर्णधार), आसिफ अली, बाबर आजम, फख्र जमां, हैरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, इमाम-उल-हक, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शाहीन अफरीदी, शोएब मलिक, वहाब रियाज.

वेस्टइंडीज- जेसन होल्डर (कर्णधार), फैबियान एलेन, कार्लोस ब्रैथवेट, डॉरेन ब्रावो, शेल्डन कोट्रेल, शानोन गैब्रिएल, क्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, शाई होप, इविन लेविस, एश्ले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, आंद्रे रसेल, ओसाने थॉमस.

X
COMMENT