आंतरराष्ट्रीय / 'भारतासोबत युद्ध झाल्यावर पाकिस्तान हरेल, पण आम्ही शेवटपर्यंत लढू', पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली

'युद्ध झाल्यावर दोनच गोष्टी होतील, पराभव किंवा शरणागती'

दिव्य मराठी वेब

Sep 15,2019 03:02:00 PM IST

इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमधील कलम 370 च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परत एकदा भारता सोबतच्या युद्धावर भाष्य केले आहे. पण, यावेळेस त्यांनी भारतासोबत इशारा देण्याऐवजी आपला कमकुवतपणा मान्य केला आहे. ते म्हणाले की, 'भारतासोबत युद्ध झाल्यावर, पाकिस्तान हरेल.'


पुढे ते म्हणाले की, "जर एखादा देश पारंपारिक युद्धात हरण्याच्या परिस्थितीत असतो, तर त्या देशाकडे दोनच पर्याय असतात. एकतर शरणागती, दुसरे म्हणजे शेवटपर्यंत लढायचे. पाकिस्तान शेवटपर्यंत लढेल, त्यामुळे परमाणू शक्ती असलेले दोन देश समोरासमोर आल्यावर परिणामही तसेच होतील."


'युद्धामुळे समस्या सोडवल्या जाणार नाहीत'
कतरमधील मीडिया ग्रुप 'अल जजीरा'ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये इम्रान यांनी स्वतःला शांतिदूत संबोधले. ते म्हणाले की, "मी आधीपासूनच युद्धाच्या विरोधात आहेत. मला वाटते की, युद्धामुळे समस्या सोडवल्या जात नाहीत. मग ते वियतनामचे युद्ध असेल किंवा इराकचे. युद्धा झाल्यावर अनेक समस्या निर्माण होतील, ज्या युद्धाच्या कारणांपेक्षा खूप मोठ्या आहेत. पाकिस्तान कधीच परमाणू युद्ध सुरू करणार नाहीत.'

X
COMMENT