आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: पाकिस्तानी तरुणीने भारतीय गाणे काय गायले, भोगावी लागतेय दोन वर्षांची अजब शिक्षा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - शेजारील राष्ट्र पाकिस्तानात एक अजब घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या विमानतळ सुरक्षा दलात गार्डची नोकरी करणाऱ्या महिलेचे दोन वर्षे प्रोमोशन किंवा पगारवाढ होणार नाही. तिची चूक एवढीच की तिने भारतीय गाणे गायले होते. गाणे गाताना तिने पाकिस्तानी झेंड्याची कॅप घातली होती. पाकिस्तानी कॅप घालून भारतीय गाणे म्हटलेच कसे असा जाब विचारत तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे गाणे सोशल मीडियावर सुद्धा शेअर करण्यात आले असून सध्या व्हायरल होत आहे. 


पाकिस्तान विमानतळ सुरक्षा दलाने आचारसंहिता उल्लंघनासाठी 25 वर्षीय महिलेच्या वेतन आणि भत्त्यात वाढीवर निर्बंध लादले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, भविष्यात ती पुन्हा असे वागत असेल तर तिच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. नया पाकिस्तानच्या घोषणेसह देशात इम्रान खान पंतप्रधान बनले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, की भारताने मैत्रीसाठी एक पाऊल उचलण्यास आम्ही दोन पावले उचलू. परंतु, भारतीय गाण्याचा इतका द्वेष पाहता खान यांचे दावे खोटे दिसून येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...