• Home
  • Bollywood
  • News
  • Pakistani actor Imran Abbas ridiculed his country film, saying 'It is headache to see the movie'

प्रतिक्रिया / पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बासने आपल्या देशातील चित्रपटाची उडवली खिल्ली, म्हणाला - 'चित्रपट पाहून डोके दुखू लागले' 

जर तुम्ही चित्रपट पाहणे सोडू इच्छिता तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे

Nov 08,2019 05:32:00 PM IST

कराची : अशातच एक पाकिस्तानी चित्रपट पाहण्यासाठी गेलेला प्रसिद्ध अभिनेता इम्रान अब्बासने आपला वाईट अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अभिनेत्याने चित्रपटाचे नाव न घेता त्याची खिल्ली उडवली आहे आणि तो चित्रपट 'डोकेदुखी' असल्याचेही तो म्हणाला. एवढेच नाही तर तो चित्रपटाबद्दल म्हणाला की, हे वर्षातील सर्वात वाईट तीन तास होते.

जर तुम्ही चित्रपट पाहणे सोडू इच्छिता तर हा तुमच्यासाठी आहे...

अभिनेता फेसबुकवर चित्रपट निराशाजनक असल्याचे सांगत म्हणाला, मला याचे कौतुक करण्याचे एकही कारण सापडले नाही. तो म्हणाला की, जे लोक पुढे चित्रपट पाहू इच्छित नाहीत, हा विशेषतः त्यांच्यासाठी आहे. सोबतच त्याने चित्रपटाचा भाग न बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकरण वाढताना दिसताच इम्रानने पोस्ट डिलीट केली.

नाही घेतले चित्रपटाचे नाव...

अभिनेत्यानुसार, चित्रपटाच्या कथेपासून ते कास्ट्यूम, सिनेमॅटोग्रॉफी आणि स्क्रीनप्ले सर्वकाही खूप वाईट होते. त्याने चित्रपटातील कलाकारांवरही टीका केली. अभिनयावर प्रश्न करत तो म्हणाला, कलाकार सैल आणि चमकदार कपड्यांमध्ये खूप खराब परफॉर्म करत होते. मात्र त्याने कुठेच चित्रपटाचे नाव नाही घेतले, पण आणखी टीका करत म्हणाला, 'समजदाराला इशारा पुरेसा.'

X