आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Actor Shaan Shahid Teasing To Shahrukh Khan For Dubbing Mufasa, Fans Trolled Shaan Shahid

पाकिस्तानी अॅक्टर शान शाहिदने शाहरुख खानची उडवली खिल्ली, चाहत्यांनी केले ट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - शाहरुख खानने डिजनीच्या 'द लॉयन किंग'च्या हिंदी व्हर्जनमध्ये मुसाफासाठी आपला आवाज दिला आहे. तर सिम्बासाठी शाहरुखचा मुलगा आर्यनने आवाज दिला. शाहरुखने याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर पाकिस्तानी कलाकार शान शाहिदने त्यावर रिप्लाय देताना शाहरुखची खिल्ली उडवली.


शान शाहिदने हे केले ट्वीट 
शान शाहिदने ट्वीट केले की, कृपया एका आयकॉनिक चित्रपटाला हिंदीत डब करून त्याला बर्बाद करू नका. शाहरुख आणि इतर व्हाइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजात कोणताही फरक जाणवत नाही. कमीत कमी सिंहाच्या आवाजासाठी तरी एक्सप्रेशन बदलायला हवे होते.  

 

 


फॅन्स केले शाहिदला ट्रोल
शाहिदच्या या ट्वीटनंतर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. काही चाहत्यांनी ट्वीट करून शाहिदला सांगितले की, हा आवाज शाहरुखचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हिंदी व्हर्जन बघा असे तुम्हाला कोणी सांगतिले. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...