आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री रेशमाची हत्या, नव-यानेच गोळी झाडून घेतला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका हिची तिच्या नव-यानेच हत्या केल्याचे वृत्त आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समजते. 35 वर्षीय  रेशमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रेशमा आणि तिचा पती फैदा खान यांच्या नात्यात दीर्घ काळापासून वितुष्ठ निर्माण झाले होते. त्यामुळे रेशमा नव-याचे घर सोडून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील नौशेरा जिल्ह्यातील तिच्या आईवडिलांकडे राहात होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून  घरात शिरुन रेशमाच्या नव-याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. रेशमाच्या भावाने फैदा खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. फैदा खान परदेशात नोकरीला असून काही दिवसांपूर्वीच परतला होता. 

 

रेशमाची समजूत घालायला गेला होता फैदा खान...
फैदा खान बुधवारी रेशमाची समजूत घालून तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. पण रेशमाने त्याच्यासोबत परत जाण्यासाठी नकार दिला. यावरुन नाराज होऊन त्याने रेशमावर गोळ्या झाडल्या. घटनास्थळीच रेशमा गतप्राण झाली. आरोपी घटनास्थळावरुन पळ काढण्यात यशस्वी झाला. रेशमा ही फैदा खानची चौथी पत्नी होती.   

बातम्या आणखी आहेत...