आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Actress Mehwish Hayat Accuses Bollywood Of 'you Are Stealing Our Songs And Then Also Abusing Us'

पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने केला बॉलिवूडवर आरोप - 'आमचीच गाणी चोरून आम्हालाच शिव्या देता'  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'प्राडा' या गाण्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने बॉलिवूडवर गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. मेहविशने एक ट्वीट करून जुनैद जमशेदचे गाणे चोरल्याबद्दल सांगितले. मेहविशने हे वक्तव्य पाकिस्तानी मीडियाला दिले होते. त्यानंतर हे ट्विटरवर शेअर केले आहे.  
 

'आम्हालाच शिव्या देतात आणि आमचीच गाणी चोरतात'...  
मेहविशने लिहिले आहे, 'मला हे खूप विचित्र वाटते की, एकीकडे बॉलिवूड पाकिस्तानला नेहमीच शिव्या देत असते आणि दुसरीकडे आमचे गाणे कुणाच्याही परवानगीविना चोरतात. कॉपीराइट उल्लंघन आणि रॉयल्टी पेमेंट्स याच्याशी त्यांना काहीच घेणे देणे नाहीये. 
 

जुनैद जमशेदच्या गाण्याची कॉपी... 
'प्राडा' हे गाणे पाकिस्तानच्या 'गोरे रंग का जमाना' या गाण्याशी मिळते जुळते आहे. ट्विटरवर अनेक पाकिस्तानी यूजर्सने याला हायलाइट केले आणि मेहविशनेदेखील त्यांच्या बोलण्याचे अनुमोदन केले.  
 

शाहरुखलादेखील मेहविशने घेरले होते... 
काही दिवसांपूर्वी मेहविशने शाहरुख खानचा नेटफ्लिक्स शो 'बार्ड ऑफ ब्लड' चीदेखील निंदा केली होती. मेहविशने लिहिले होते, अखेर ती गोष्ट सत्य ठरवली आहे, जे मी कधीपासून म्हणत आहे. आणखी एक कमकुवत आणि पाकिस्तानविरोधी प्रोजेक्ट. आता आपण जागे होऊ आणि समजून घेऊ का की, बॉलिवूडचा अजेंडा काय आहे ? शाहरुख खान, देशभक्त बना, कुणी तुम्हाला यापासून रोखणार नाही पण आम्हला शिव्या देऊन नाही.'

बातम्या आणखी आहेत...