आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Artists Boycotts Award Ceremony Because Best Actor's Is Given To Ali Zafar, Organizers Said Nothing To Do With Allegations

अली जफरला अवॉर्ड दिल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनी बॉयकॉट केली सेरेमनी, आयोजक म्हणाले - 'आम्हाला आरोपांशी काही देणे घेणे नाही' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची : बॉलिवूडच्या चित्रपटांचा भाग असलेला पाकिस्तानी कलाकार अली जफरवर झालेल्या मीटू प्रकरणाने पुन्हा वेग धरला आहे. अलीला बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाल्यामुळे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आयोजित पाकिस्तान लक्स स्टाइल अवॉर्डमध्ये अलीच्या नोमिनेशननंतर सेलिब्रिटी कार्यक्रमातून बाहेर निघून गेले. एवढेच नाही चित्रपट दिग्दर्शक जमीने विरोध दर्शवत तीन अवॉर्ड्स घराबाहेर रस्यावर फेकून दिले. 

मीशा आणि अलीने केले आहे एकत्र काम... 
पाकिस्तानच्या प्रतिष्ठित चित्रपट अवॉर्ड सेरेमनीमध्ये मीटूचे आरोप असलेला अली जफरचा खूप विरोध केलेला पाहायला मिळाला प्रोग्रामदरम्यान अलीला बेस्ट अॅक्टर बनवल्यामुळे अनेक कलाकार कार्यक्रम सोडून निघून गेले. मात्र शोच्या आयोजनकर्त्यांनी स्टेटमेंट जारी करत सांगितले की, त्यांना पाकिस्तानमध्ये मीटूच्या आरोपांशी काही देणे घेणे नाही.  


अलीला पुरस्कार दिल्यामुळे नाराज दिग्दर्शकाने विरोध व्यक्त केला. देशातील प्रसिद्ध दिग्दर्शक जमीने फिल्म बेस्ट फिल्म अवॉर्ड रस्त्यावर फेकून दिले. त्याव्यतिरिक्त मॉडेल इमान सुलेमाननेही इंस्टावर व्हिडिओ अपलोड करून विरोध व्यक्त केला होता. 


पाकिस्तानी अॅक्ट्रेस मीशा शफीने मागच्यावर्षी एप्रिलमध्ये ट्विटरवर एक नोट जारी करत अली जफरवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र उत्तर देताना अलीने या आरोपांचे खंडन केले होते. अॅक्टरने ट्विटरवर लिहिले की, हे प्रकरण न्यायालयात जाऊन सोडवले जाईल. सोबतच अॅक्टरने मीशावर बदला घेतल्याचा आरोपही केला होता. 

बातम्या आणखी आहेत...