आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Astronaut Praises ISRO On Chandrayaan , Japan India To Launch Moon Mission In 2020

पाकिस्तानची अॅस्ट्रोनॉट नमीरा यांनी केले इस्रोचे कौतुक, म्हणाल्या- 'कोणता देश मिशन लीड करतोय, हे महत्वाचे नाहीये'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानची पहिली महिला अंतराळवीर नमीरा सलीम यांनी चंद्रयान-2 बद्दल इस्रोचे तोंटभरुन कौतुक केले आणि याला एक  ऐतिहासिक प्रयत्न असल्याचे म्हटले. ती म्हणाली की, "मी भारत आणि इस्रोला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगच्या प्रयत्नासाठी अभिनंदन करते. चंद्रयान-2 फक्त दक्षिण आशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक गर्वाचा विषय आहे."


7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागावासून फक्त 2.1 किमी आधी लँडर विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला होता. सध्या, हे चंद्रावर आडवे पडले आहे, रोव्हर प्रज्ञान त्याच्या आत सुरक्षित आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ लँडर आणि रोव्हरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अंतराळात राजकीय सीमा संपतात- नमीरा समील
त्या पुढे म्हणाल्या की, अंतराळ क्षेत्रात दक्षिण आशियाची कामगिरी खूप उल्लेखनीय आहे. कोणता देश या मिशनला लीड करत आहे, याने काहीच फरक पडत नाही. अंतराळात सर्वर राजकीय सीमा संपून जातात आणि सर्वजण एकत्रीत येतात. नमीरा पाकिस्तानकडून अंतराळा जाणारी पहिली महिला आहे.

भारत-जापान मिळून लॉन्च करणार 'मून मिशन'
भारतात असलेल्या जापान दूतावासाने चंद्रयान-2 साठी इस्रो आणि त्याच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. त्यांनी विश्वास दाखवला की, भारत  भारत लूनर मिशनमध्ये आपले योगदान सुरूच ठेवेले. त्यांचे म्हणने होते की, जापानची अंतराळ संस्था 'जापान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजंसी' (जाक्सा) आणि इस्रो 2020 पर्यंत संयुक्तपणे लूनर मिशन लॉन्च करेल.